परराज्यातून आलेला 121 किलो गांजा पकडला !

 80 लाख 83 हजाराचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ओडिसा राज्यातून विक्री करता आणलेला 120 किलो 905 ग्रॅम वजनाचा गांजा सापळा रसून पकडला आहे. वडगाव गुप्ता शिवारात ही कारवाई करण्यात आली असून गांजासह 80 लाख 83 हजार 464 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि / अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दिपक घाटकर, फुरकान शेख, लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आतार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जयराम जंगले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन इसमांनी ओडीसा राज्यातून अंमली पदार्थ गांजा खरेदी करुन त्यांचा हस्तक नवनाथ अंबादास मेटे (रा. श्रीगोंदा) व नवनाथ मेटे याचा एक साथीदार यांचेकडील ट्रक क्रमांक एम.एच. १४ जी. यु. २१११ हिमध्ये भरुन विक्री करण्याकरीता आणलेला असल्याची माहिती मिळाली.

पोलीस निरीक्षक कबाडी यांनी छाप्याचे नियोजन करुन वरील पथक, अहिल्यानगर ग्रामीण उपविभागातील फॉरेन्सिक टिम सह शेंडी बायपास ते एम. आय. डी. सी. जाणाऱ्या रोडवर वडगांव गुप्ता गावाच्या शिवारातील हॉटेल किनाराजवळ सापळा रचून थांबले असता सदर ट्रक येताना दिसला. हा ट्रक थांबविण्यात आला.

सदर ट्रक मध्ये १) नवनाथ अंबादास मेटे वय ३८ वर्षे, रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, २) ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे वय ३१ वर्षे, रा. मळेगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर या दोन व्यक्ती आढळून आल्या त्यांना ताब्यात घेण्यात आले. ट्रकची पंच, फॉरेन्सिक टिम यांचे मदतीने झडती घेतली असता केबीनवरील टपावर ६ गोण्यामध्ये ३० लाख २२ हजार ६२५/- रुपये किमतीचा १२० किलो ९०५ ग्रॅम गांजा मिळून आला.. गांजा सह एकूण ८०,८३,४६४/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीविरुध्द पोकॉ/ २५२० प्रकाश नवनाथ मांडगे, नेम – स्थानिक गुन्हे शाखा. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे ग.र.नं. ६५० / २०२५ गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८(क), २० (ब) ii (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींचे ताब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा मिळुन आलेला असुन सदर गांजा तस्करीची व्याप्ती मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने मा. पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असूनपुढील तपास पोउपनि / अनंत सालगुडे नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर हे करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!