अवैध दारू अड्ड्यांवर छापे !

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर तालुका आणि सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा ठिकाणी अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई केली आहे. यामध्ये 6 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोहेकॉ/राहुल द्वारके, पोहेकॉ/गणेश लबडे, पोहेकॉ/ सुयोग सुपेकर, पोना/रिचर्ड गायकवाड, पोना/सोमनाथ झांबरे, रोहीत येमुल, पोकॉ/अमोल अजबे, पोकॉ/ प्रकाश मांडगे, पोकॉ/योगेश कर्डीले, मपोकॉ/सारिका दरेकर चालक पोकॉ/अरुण मोरे या पथकाने ही कारवाई केली आहे.

पथकातील पोलीस अंमलदार यांनी अहिल्यानगर तालुका व सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध देशी विदेशी दारु विक्रेत्यांची माहिती काढुन 6 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. कारवामध्ये अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द एकुण 6 गुन्हे दाखल करुन 50 हजार 980/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

पोलीस स्टेशन निहाय कारवाई खालील प्रमाणे

अ.नं. पोलीस ठाणे दाखल गुन्ह्यांची संख्या जप्त मुद्देमाल किंमत

1 अहिल्यानगर तालुका 2,08,480/-

2 सोनई 4 42,500/-

एकुण 6 50,980/-

सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!