अकोले शहरातील बिंगो ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा !

 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

16 आरोपींकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य जप्त

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अकोले शहरातील बस स्थानकासमोर असणाऱ्या नवले कॉम्प्लेक्स मध्ये बिंगो ऑनलाइन जुगार अड्ड्यावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. यामध्ये 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, आकाश काळे, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पथक अकोले शहरामध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास अकोले शहरात बस स्टँड समोर, नवले कॉम्प्लेक्स मधील एका गाळ्यामध्ये काही लोक ऑनलाईन बिंगो, मटका व डॉलर नावाचा हार जितीचा जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून 16 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींकडून 4 लाख 98 हजार 700 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

1) नितीन निवृत्ती गायकवाड, वय 30 वर्षे, रा.इंदिरानगर, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 2) अमोल मारुती मोहिते, वय 25 वर्षे, रा. इंदिरानगर, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 3) वैभव राजेंद्र गायकवाड, वय 25 वर्षे, रा. कुंभारवाडा, अकोले ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 4) व्हेल्सी गफुर वाघीलो, वय 30 वर्षे, रा. शाहुनगर, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 5) अक्षय बाबासाहेब सकट, वय 24 वर्षे, रा शिवाजीनगर, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 6) गोपी भाऊराव आवारी, वय 26 वर्षे, रा. धामनगाव, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 7) अरबाज मोहम्मद शेख, वय 25 वर्षे, रा. शिवाजी चौक, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 8) आकाश संजय परदेशी, वय 32 वर्षे, रा. कुंभारवाडा, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 9) रमेश एकनाथ फापाळे, वय 30 वर्षे, रा. लिंगदेव, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 10) अनिल बाळु पवार, वय 35 वर्षे, रा. शाहुनगर, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 11) विकास दत्तात्रय आबरे, वय 29 वर्षे, रा. गणोरे, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 12) खंडु केरु सदणीर, वय 28 वर्षे, रा. खिरवीरे, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 13) शंशीकांत मुरलीधर बेनके, वय 30 वर्षे, रा. खिरवीरे, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 14) अशोक राजेंद्र जगताप, वय 25 वर्षे, रा. शिवाजी महाराज चौक, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, 15) गणेश हौसराव साबळे रा. शनि मंदीरच्या पाठीमागे, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर (फरार) 16) अतुल जालींदर नवले, रा. अगस्ती आगार, अकोले, ता.अकोले, जि. अहिल्यानगर(फरार) हे जुगाराच्या साहित्य साधनांसह ऑनलाईन बिंगो, मटका, व डॉलर नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना म्हणून आले.

आरोपीविरुध्द पोकॉ/93 आकाश राजेंद्र काळे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अकोले पोलीस स्टेशन गु.र.नं. 394/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!