महिला साथीदाराच्या सहाय्याने घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद !

 11 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात दिवसा घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये महिलेच्या साह्याने घरफोडी करणाऱ्या एका सराईत आरोपीला साने गुन्हे शाखा एलसीबी अहिल्यानगर यांनी 48 तासात जेरबंद केले असून त्याच्याकडून 80 लाख 79 11 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

सोमनाथ शिवाजी भडांगे रा. कौठे कमळेश्वर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर हे सुमारास कार्यक्रमानिमीत्त बाहेरगावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन घरातील ९ लाख ९२ हजार २८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वर नमुद गुन्हा तसेच मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि / अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, भाऊसाहेब काळे, अमृत आढाव, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर, महिला पोलीस अंमलदार सारिका दरेकर ज्योती शिंदे, यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

पथकाने घरफोडीच्या घटनाठिकाणी भेट देवुन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करुन सदर माहितीच्या आधारे वरील दाखल गुन्हा हाटोण्या भाऊसाहेब काळे (रा. शेवगांव) व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. आरोपींचा शोध घेत असतांना टोण्या काळे हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार त्यास घरी जाऊन पकडण्यात आले. टोण्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे (वय २० वर्षे, रा. लखमापुरी, ता. शेवगांव,जि. अहिल्यानगर) ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून माहिती मिळाली की तो आणि २) राहुल भाऊसाहेब काळे (रा. लखमापुरी, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर,) ३) सौ. देवका अग्नेश चव्हाण (रा. सदर) यांचेसह केला सदर गुन्हा केला असल्याचे सांगितले. चोरीतील दागिने त्याच्या घराजवळ पुरुन ठेवल्याचे सांगितल्याने पथकाने आरोपीकडून ११,७९,१४०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

आरोपी टोण्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे याचा अभिलेख तपासला तो खालीलप्रमाणे ६ गुन्ह्यामध्ये फरार आहे. काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यामध्ये खुन, जबरी चोरी, घरफोडीचे खालीलप्रमाणे ०८ गुन्हे दाखल आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!