चंदनापुरी घाट अपघात प्रकरण ; ठेकेदार कंपनीवर कारवाई करा –

आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत मागणी

 सर्व स्कूल बसचे फिटनेस ऑडिट करण्यात यावे

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क दि. 17 

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात ४ जुलै रोजी झालेल्या स्कूलबस अपघातप्रकरणी जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभा अधिवेशनात केली. तसेच, संपूर्ण महाराष्टातील सर्व शाळांच्या बसचे फिटनेस ऑडिट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग काँक्रिटी करणाचे काम सुरू झाल्यापासून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत ४८ अपघातांमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आमदार खताळ यांनी विधानसभेच्या सभागृहात मांडत या अपघातांना कारणीभूत ठरलेली शंकर रामचंद्र इन्फ्राकंपनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणविभागाशी केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून, काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण ठेवले आहे.

त्यामुळे चंदनपुरी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच चंदनापुरी घाटात काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती, त्यामुळेच स्कूलबस पलटी होऊन अपघातात झाला होता. त्यात १६ विद्यार्थी जखमी झाले होते. अपघातग्रस्त बसला परिवहन विभागा कडून परवानगी होती का असासवाल उपस्थित करत त्याची चौकशी करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी करत आमदार खताळ यांनी सर्व स्कूल बसचे फिटनेस ऑडिट तातडीने करण्याचे मागणी राज्य सरकारकडे केली

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!