“एक झाड आपल्या गुरुंसाठी”…..
बालपण स्कूल — पानोडी व आश्वी च्या विद्यार्थ्यांचा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा….
पानोडी – आश्वी प्रतिनिधी दिनांक 11
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आगळ्यावेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना वृक्ष भेट देत व गुरु सोबत वृक्षारोपण करत “”एक झाड आपल्या गुरुंसाठी” असा उपक्रम राबवत व गुरूंविषयी अतिशय मार्मिक शब्दात भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा उत्सव बालपण स्कूलच्या प्रांगणात साजरा केला.

बालपण स्कूलच्या के.जी व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य हे नाते गुरुकुल पौराणिक पद्धतीने साधूच्या वेशभूषेत कुटीमध्ये गुरु शिष्याचे नाते असा देखावा सादर करत शाळेतील शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी अरण्यात गुरुकुल उभारून जनसामान्यांना व राजा महाराजाच्या मुलांना वेद अभ्यास शिकवत असत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, उपनिषदे इत्यादींचे शिक्षण ते आपल्या शिष्यांना देत असत. त्याचाच एक देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला व अरण्य आणि गुरुकुल पद्धत ही विद्यार्थ्यांनी जाणून घेतली या देखावेतून बालपणच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे म्हणजेच शिक्षकांचे वृक्ष भेट फुले भेट देऊन त्यांचे मनोभावे दर्शन घेत शिक्षकांनी आपल्या शिष्यांना आशीर्वाद दिले.
या उपक्रमासाठी बालपण स्कूलच्या पानोडी व आश्वी च्या सर्व शिक्षकांनी महत्त्वपूर्ण असे योगदान दिले. बालपणच्या प्रमुख सोनाली मुंढे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साजरा करण्यात आला.
