हरीबाबा देवस्थानला *क* वर्ग दर्जा ….
वेल्हाळे ग्रामस्थांच्या वतीने आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार
संगमनेर प्रतिनिधी दि 12
तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गालगत असलेल्या व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला आमदार सत्यजित तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असून याकामी विशेष पाठपुरावा केल्याबदल वेल्हाळे ग्रामस्थांच्या वतीने सत्यजित तांबे यांचा सत्कार करण्यात आला.

संगमनेर येथे आमदार तांबे यांची देवस्थानचे अध्यक्ष गोविंद नाना जेडगुले यांनी भेट घेत त्याचा सत्कार केला. यावेळी संपत गणपत वामन (उपाध्यक्ष) शंकर कोंडाजी गुळवे (सचिव ) संतोष जगन्नाथ भांड (विश्वस्त) ज्ञानदेव सुखदेव वामन , सचिन भास्कर गुळवे, तानाजी सतु शिरतार, मंगेश कांडेकर, विलास नवले, सुधीर नवले, गोरख सदाशिव शिरतार, सोमनाथ हरिभाऊ सोनवणे, गोरख लक्ष्मण सोनवणे, विष्णू संपत आव्हाड (सरपंच ) सिताराम म्हसू गुळवे (उपसरपंच) सुनील जाधव, निवृत्ती खरात आदीसह विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

वेल्हाळे परिसरातील हरीबाबा हे प्रसिद्ध देवस्थान असून कारखाना, मालदाड, साईखिंडी, गुंजाळवाडी चिकणी, परिसरातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून यापूर्वीही मंदिर परिसरात विविध विकास योजना राबवण्यात आल्या आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणी वर्षभर हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या परिसराच्या विकासाबरोबरच हरिबाबा मंदिर देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्याने आता या ठिकाणी सुशोभीकरणासह सर्व सुविधा निर्माण करण्यात येतील. याकरिता आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा नियोजन समितीकडे 30 जानेवारी 2025 रोजी पत्र देऊन हरी बाबा देवस्थानला क वर्ग दर्जा देण्याची आग्रही मागणी केली होती. जिल्हा नियोजन बैठकीत या मागणीला मान्यता देण्यात आली.

हरीबाबा देवस्थानला क वर्ग दर्जा देण्याच्या मागणीचा विशेष पाठपुरावा केल्या बाबत सत्यजित तांबे यांचे हरीबाबा देवस्थान ट्रस्ट, सायखिंडी, मालदाड, घुलेवाडी, अमृतनगर गुंजाळवाडी, चिकणी, राजापूर यांसह परिसरातील गावातील नागरिकांनीही विशेष अभिनंदन केले आहे.
