तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आचारणात आणावे – आमदार अमोल खताळ
छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने जयंती साजरी
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 16
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर शत्रूंनी अन्याय अत्याचार केले. मात्र त्यांनी स्वराज्य मिळविण्यासाठी शत्रूशी दोन हात करत आपल्या प्राणाची अहूती दिली होती. हा इतिहास कोणालाही विसरून चालणार नाही. तसेच त्यांना कोणी एका बंधनात अडकून ठेवू शकत नाही. कारण त्यांचा त्याग अन बलिदान कधीच विसरू शकणार नाही. आजच्या तरुण पिढीने त्यांचे विचार आचरणात आणावेत असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.


संगमनेर शहरातील नवीन नगर रोडवर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते या वेळी व्यासपीठावर देहू येथील निरंजन महाराज मोरे, गिर्यारोहक श्रविका म्हात्रे, ज्ञानेश्वर पठाडे, ओंकार पांडव, विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, रेखा गलांडे, दिपाली वाव्हळ, शशांक नामन, छत्रपती छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय चिलप, उपाध्यक्ष विश्वेश मोहरीकर, सिद्धेश पवार, कार्याध्यक्ष सुरज पवार, खजिनदार अजय धारणकर, विनायक वडतले यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, स्वाभिमानासाठी आणि स्वराज्या साठी प्राणांची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत आहेत. छत्रपती संभाजी राजांचा आदर्श घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा बंदोबस्त केला आहे. जर आमच्या कोणी नादी लागले तर त्यांचा आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय सोडणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.
