माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर साखर कारखान्याचे निवडणूक लढविणार : उमेदवारी अर्ज दाखल
संगमनेर प्रतिनिधी दि. 3
अनेक वेळा बिनविरोध झालेली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगमनेर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा विरोधक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने जोरदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या पारंपारिक जोर्वे गटातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणूक 2025 ते 2030 च्या संचालक मंडळाची ही निवडणूक होत आहे. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि बाळासाहेब थोरात यांचा पारंपारिक गट जोर्वे या गटातून अर्ज भरण्यात आला असून थोरात यांचा अर्ज रखमाजी रामकृष्ण दिघे, सुरेश थोरात, हौशीराम सोनवणे व श्रीकांत गिरी यांनी आज प्रांत कार्यालयात अधिकाऱ्यांकडे सादर केला असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

आमदार अमोल खताळ यांनी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्याने आणि विरोधकांची बैठक घेतल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. आमदार खताळ यांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडून सर्व सहकार्य मिळत असल्याने ही निवडणूक रंगतदार ठरणार असल्याची चिन्हे आहेत.
