भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज भारतरत्न लता मंगेशकरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रतिनिधी —
आपल्या अलौकीक आवाजाने फक्त भारतालाच नव्हे तर जगाला मोहून टाकणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना संगमनेर भारतीय जनता पक्षाचे वतीने आज श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू , तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, किसान मोर्चा अध्यक्ष सतीश कानवडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमाणी, मनोज जुंदरे, हरीश वलवे, माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, हरिश्चंद्र चकोर, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष रेश्मा खांडरे, ज्योती भोर, अरुणा पवार, बाळासाहेब भांडगे, दिलीप रावल, शिवकुमार भंगिरे, विकास गुळवे, जग्गु शिंदे, अरुण शिंदे, अमोल रणाते, सुमित राऊत, प्रमोद भोर, रोहिदास साबळे, बाबुराव खेमनर, संजय वाकचौरे, डॉ कैलास वाघमारे, सोमनाथ बोरसे, संजय वाकचौरे, किरण गुंजाळ, कैलास हांडे, अनिल निळे, सचिन मुके, सुनील घुले, विनायक थोरात इ.कार्यकर्ते उपस्थित होते.
