राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध ; राजीनाम्याची मागणी
प्रतिनिधी संगमनेर दि. 11
शिवद्रोही राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, शुधांशू त्रिवेदी, भगतसिंग कोश्यारी, मनोहर भिडे यांच्यावर कारवाई व बीड, परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख यांना न्याय मिळणेबाबत व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कमी पडलेल्या मुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला असून त्यांच्या राजीनामाची देखील मागणी करण्यात आली आहे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाला तसे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शिवद्रोही असलेले हे सर्व गुन्हेगार वारंवार स्वराज्य प्रेरिका जिजाऊ, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे, महात्मा फुले, सावित्री, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अश्या अनेक बहुजनांच्या थोर महापुरुषांबद्दल जाणूनबुजून वादग्रस्त विधान करतात. सर्वप्रथम हे थांबलेच पाहिजे व या नीच विकृत विचारांच्या व्यक्तींना कायदेशीर कारवाई करून अटक करावी.

परभणीमध्ये संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी या नागरिकाला पोलिस कोठडीमध्ये डांबून अन्याय अत्याचार करून त्याचा खून केला त्या सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळायला हवा. व गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात कमी पडलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख प्रकरणात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. महाराष्ट्र राज्यात 2014 पासून कायदा व सुव्यवस्था यामध्ये जो काही बिघाड झाला आहे.
संगमनेरचे तहसीलदार धीरज नांद्रे मांजरे यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राम अरगडे तसेच अमोल शेलकर, मोहसीन शेख, अनिकेत घुले, शुभम आव्हाड, रोशन गोफणे, आदिल रूपवते, योगेश गायकवाड, प्रथमेश बालोडे, रोहित गुंजाळ आदी उपस्थित होते.
