राहुल सोलापूरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी
संभाजी ब्रिगेडचे पोलिसांना निवेदन
संगमनेर प्रतिनिधी दि. 12
राहुल सोलापूरकर यांनी बहुजनांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या बद्दल जे अवमान कारक वक्तव्य केले आहे ते चुकीचे चुकीचे असून बहुजन समाजाच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संगमनेर संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस स्टेशन आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

तसेच माता रमाई यांच्या जयंती दिवशी तालुका कोपरगाव येथे माता रमाईचे फलक लावण्यात आले होते,
लोकशाही, भारतीय संविधान न मानणाऱ्या व एक विशिष्ट विकृत विचारांची,भेदभावाची, उच नीचतेची वासना मनामध्ये ठेवून ते फलक काही व्यक्तींकडून फाडण्यात आले. हा अपमान लोकशाहीचा,भारतीय संविधानाचा, थोर विचारवंत, समाजसुधारक,महामानव, संत, महात्मे या सर्वांचा अपमान आहे.

त्यामुळे त्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशी ही मागणी निवेदनात करण्यात आले असून कारवाई न झाल्यास सर्व पुरोगामी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनावर राम अरगडे, नवनाथ जाधव, रोशन गोफणे, शुभम आव्हाड, मनोज जेडगुले, विशाल वैराळ, आदित्य रुपवते यांच्या सह्या आहेत.
