संगमनेर तालुक्यातील घटना…

लाखो रुपयांची विदेशी दारू चोरणारे अद्याप पसार

उत्पादन शुल्क विभागाचे मौन ; गाडीचा मालक अद्याप गायब 

दारूची नोंदणी आणि अधिकृतता संशयास्पद 

संगमनेर दि. 3 विशेष प्रतिनिधी —

लाखो रुपयांचे विदेशी मध्य घेऊन निघालेला एक मोठा ट्रक संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शिवारात एका ओढ्यात पलटी झाला या ट्रक मधील सुमारे 65 लाख रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स चोरण्यात आले. तेव्हापासून ट्रक चालक गायब होता आणि ट्रक मालकही गायब आहे. चार महिने होत आले तरी ट्रक मालकाचा पत्ता नाही. दारू चोरणारे आरोपी सापडले नाहीत. उत्पादन शुल्क विभाग यामध्ये मौन बाळगून आहे. तसेच दारू विकणारे आणि दारू घेणारे यांच्या भूमिकेबाबत ही संशय उपस्थित होत आहे. तर सदर गाडीतून वाहतूक करण्यात येणारी दारू ही नोंदणीकृत होती की अनधिकृत होती याबाबतही खुलासा होत नाही. त्यामुळे हे सर्व प्रकरण व्यवस्थित प्लॅन करून ठरवून केले असल्याचा संशय घेण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून मॅकडॉल कंपनीच्या दारूच्या बाटल्यांचे बॉक्स घेऊन अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच 12 एल टी 73 29 हा पुणे येथे डिलिव्हरी देण्यास जाणार होता. मात्र नाशिक पुणे अशा सरळ मार्गावरून हा ट्रक न जाता संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शिवारात कानवडे वस्ती जवळ पलटी झाला आणि यातील दारूचे बॉक्स विखुरले गेले. ते चोरून नेण्यात आले. सुमारे 930 दारूचे बॉक्स चोरण्यात आले आणि त्याची किंमत 65 लाख रुपये असल्याचे सांगितले गेले. हे दारूचे बॉक्स चोरण्यात एका संघटनेचा देखील हाच होता असे बोलले जात आहे. चार महिने होत आले तरी या प्रकरणात अद्याप कुठलीही प्रगती झाली नसून सर्व महत्त्वाचे विभाग शांत झाले आहेत.

दारू चोरणारी टोळी !

एकदम जुनी गाडी खरेदी करायची आणि ट्रान्सपोर्टचा व्यापार करीत आहोत असे खोटेच दाखवून लाखो रुपयाचा माल गाडीत भरायचा आणि माल देण्यासाठी गाडी ज्या ठिकाणी न्यायची आहे त्या ठिकाणी न नेता भलत्याच निर्जन ठिकाणी नेऊन तो माल दुसऱ्या गाडीत भरून घेऊन पळून जायचे किंवा तो माल विकायचा असा उद्योग करणारी टोळी यात सहभागी असावी असा पोलिसांचा सशय आहे. ही गाडी देखील ठरल्या मार्गावरून न जाता ग्रामीण भागातून अतिशय अरुंद रस्त्याने वेगळ्याच मार्गावर का गेली हा भाग संशयाचा आहे. मात्र रस्त्याने जात असतानाच ही गाडी वडगाव लांडगा शिवारात पलटी झाल्याने या टोळीचा डाव फसला असावा असा कयास आहे. त्यामुळे ही टोळी पसार झाली. गाडी चालक ही पसार झाला होता. अद्यापही गाडीचा मालक मिळून आलेला नाही. त्यामुळे यात काहीतरी काळेबेरे होते असाही पोलिसांचा संशय आहे.

गाडीचा ड्रायव्हर सापडला — मालक गायब !

अपघातग्रस्त गाडीचा ड्रायव्हर घटना घडल्यानंतर गाडी आणि लाखो रुपयांचे दारूचे खोके येथे सोडून पळून गेला होता तो गाडी सोडून पळून का गेला याचे गुड मात्र अद्याप पर्यंत उकलल नाही संभाजीनगर परिसरात राहणारा हा चालक पोलिसांनी पकडला मात्र त्याच्याकडून कोणतीही माहिती निष्पन्न झाली नाही असे सूत्रांनी सांगितले आहे तर गाडीचा मालक अद्याप समोर आला नसून मालकही गायब असल्याची माहिती मिळाली त्यामुळे गाडी विषयी मालकाला कुठलेही काळजी नसल्याचे दिसून येते. 

दारू चोरणारे अद्याप सापडले नाहीत 

विशेष म्हणजे या गाडीमधून सुमारे 65 लाख रुपयांची विदेशी दारू बॉक्स मधून नेण्यात येत होती. गाडी पलटी झाल्यानंतर गाडीतील दारूचे बॉक्स चोरून नेण्यात आले. यामध्ये सुमारे 930 बॉक्स चोरण्यात आले असून त्याचा अद्याप पर्यंत थांग पत्ता लागलेला नाही. पोलिसांना देखील हे दारू चोरणारे सापडलेले नाहीत. दारूचा एक बॉक्स चोरणारा एक आरोपी पोलिसांना सापडला. तो स्थानिक होता त्यालाही अटक करून नंतर सोडण्यात आले असल्याचे समजले. मात्र उर्वरित मोठ्या संख्येने जे बॉक्स चोरी करण्यात आले त्याच्याशी एका संघटनेचा संबंध असल्याचा संशय असून तसे घटना घडल्यापासून बोलले जात आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मौन 

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुठलीही भूमिका घेतली नसल्याचे चित्र दिसत असून आणि दारूच्या बाटल्यांवरील टीपी पावती विषयी शंका असून देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. दारू वाहतूक करताना टीपी पावती बरोबर होते की नव्हती किंवा नोंदणीकृत दारू होते की नव्हती याबाबतही शंका उपस्थित होत आहे. राज्य उत्पादन शुल्क अशा प्रकरणात कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहे हे समजून येत नाही. लाखो रुपयाचा माल वाहून नेणारे विकणारे, तो घेणारे आणि गायब होणारे यात संशय घेण्यास वाव आहे. आणि असे असूनही राज्य उत्पादन शुल्क विभाग यावर गप्प कसा असा सवालही उपस्थित झाला आहे

 

मुळात या गाडीतील दारू चोरीच गेली नसेल तर ? गाडीचा चालक आणि मालक यांच्यासह दारू विकणारे आणि घेणारे यात सहभागी असतील तर ? आणि अधिकृत नोंदणी नसलेला हा माल बाजारात विकण्यासाठी असा प्लॅन केला असेल तर ? असा संशय घेण्यास वाव असून त्यावेळी विधानसभा निवडणुकीचा हंगाम सुरू होता…

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!