पियुष घुले उदयोन्मुख बालवक्ता म्हणून सन्मानित
संगमनेर दि.
परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय पिंपरणे व संगमनेर साहित्य परिषद संगमनेर आयोजित चैतन्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वक्तूत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ मध्ये मा.रू दा. मालपाणी विद्यालय संगमनेरचा पाचवीचा विद्यार्थी पियुष भागवत घुले यांस उदयोन्मुख बालवक्ता म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

पियुष घुले यांनी या स्पर्धेत मला आवडले पुस्तक ‘बलसागर भारत होवो’ यावर आपले परखड विचार मांडून आयोजन व प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. सुप्रसिध्द चित्रपट गीतकार व कलावंत बाबासाहेब सौदागर आणि मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख गिरीष मालपाणी यांच्या हस्ते पियुष घुलेला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पियुष घुले यांनी गिरीष मालपाणी यांचे स्केच भेट म्हणून दिले त्याचे विशेष कौतुक मालपाणी परिवारा कडून करण्यात आले.

आयोजक समिती अध्यक्ष बापुसाहेब देशमुख प्राचार्य वाळे तसेच मालपाणी विद्यालयाच्या अध्यक्षा सुवर्णाताई मालपाणी, मुख्याध्यापक हापसे, पर्यवेक्षक, थोरात, वर्गशिक्षिका खरात, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पियुषचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

