पोलिसांचा कत्तलखान्यवर छापा ; पाच जणांवर गुन्हा दाखल
संगमनेर दि. 5
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव मध्ये वेगवेगळ्या कत्तलखान्यांवर छापे टाकून २ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अफवान इस्माईल कुरेशी, मुज्जाहिद नुरमोहमंद कुरेशी, आरफाद अश्पाक कुरेशी (सर्व रा. रा.खाटीकगल्ली, शेवगाव) एक विधीसंघर्षित व बब्बू अजीज शेख (रा.दादेगाव रोड, शेवगाव) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबर मिळाल्यानंतर या पथकाने शेवगाव मध्ये छापा टाकल्यानंतर या ठिकाणी अवैधरित्या डांबून ठेवण्यात आलेले गोवंश जनावरे तसेच गोवंश मांस आढळून आले पोलिसांनी हे सर्व ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आहे.
दोन वेगवेगळया ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. त्यामध्ये शेवगाव पोलीस स्टेशनला 5 आरोपीविरूध्द 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींच्या ताब्यातून 310 किलो गोमांस, 2 गायी, 1 कालवड, 1 वासरू व 4 सुरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

या कारवाईत पथकातील पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, पंकज व्यवहारे, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, रमीजराजा आत्तार आदींनी सहभाग घेतला.
