ओकिनावा राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप ; अद्विता आनंद हासे हिचे दैदिप्यमान यश

 प्रतिनिधि —

पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या 27 व्या ओकिनावा नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये संगमनेरची कुमारी अद्विता आनंद हासे हिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील काता प्रकारामध्ये तिला रौप्य पदक तर स्पायरींग या क्रिडा प्रकारामध्ये कांस्यपदक मिळाले आहे.

पुणे येथे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट कॉम्प्लेक्स, बालेवाडी या ठिकाणी 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

संगमनेर येथील कराटे अकॅडमीचे संचालक दत्ता भांदुर्गे सर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. द्वितीय क्रमांकाचे सर्वाधिक पदकं मिळवून या स्पर्धेत संगमनेर टीमने राष्ट्रीय उपविजेतेपद मिळविले आहे.

कुमारी अद्विता हासे अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 4 थी या वार्गात शिकत आहे. आद्विताने या आगोदरही अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळविली आहे. दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे यांची नात असून तिच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे. दैनिक युवावार्ता व युवा पॉलिप्रिंट व पॅकेजिंग इंडस्ट्रीजच्या वतीने कुमारी अद्विताचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Oplus_131072

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *