सहकार व चांगली संस्कृती जपायची आहे — आ.थोरात
थोरात कारखान्याकडून 3015 रु. भाव जाहीर ; बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
प्रतिनिधी —
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था काम करत असून या संस्थांमुळे तालुक्यातील नागरिकांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण झाली आहे. एकरी जास्तीत जास्त उत्पादन वाढवताना कार्यक्षेत्रात 10 लाख टना पेक्षा जास्त ऊस निर्माण झाला पाहिजे. चांगला सहकार व चांगली संस्कृती आपल्या सर्वांना जपायची असून मागील हंगामातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रति टन 3015 रुपये प्रमाणे भाव कारखान्याने जाहीर केला असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, संतोष हासे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकर खेमनर, लहानभाऊ गुंजाळ, आर.बी. राहणे, गणपतराव सांगळे, रामदास वाघ, चंद्रकांत कडलग, अर्चना बालोडे, मीरा शेटे, निर्मला राऊत, निर्मला गुंजाळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, सहकारी संस्थांमुळे संगमनेरची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. येथील अर्थव्यवस्था समाजजीवन आणि प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा नक्की प्रभाव दिसत आहे. कारखान्याने कायम चांगला भाव दिला असून यामुळे शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी या सर्वांमध्ये आनंद आहे

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 10 लाख मे. टन पेक्षा जास्त ऊस उत्पादन होणे गरजेचे आहे. कमी क्षेत्र आणि कमी पाण्यामध्ये एकरी जास्तीत जास्त उत्पादन झाले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. थोरात कारखान्यावर शेतकरी, सभासद, आणि कार्यक्षेत्राबाहेरी ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास असून हा विश्वास हेच कारखान्याचे भांडवल आहे.

निळवंडेच्या पाण्यामुळे दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी याचा नक्कीच लाभ होणार आहे. दूध संघाने सातत्याने चांगला भाव दिला असून प्रति लिटर एक रुपयाप्रमाणे रिबिट जाहीर करून नुकतेच 38 कोटी रुपये बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. कारखान्याने ही यापूर्वी 2800 रुपये प्रति टन भाव दिला असून दिवाळीनिमित्त 215 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून 3015 पंधरा रुपये असा भाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. हीच समृद्ध परंपरा आपल्याला कायम जपायचे असून एकरी जास्तीत जास्त उत्पादन करा असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी संचालक रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, संभाजीराव वाकचौरे, मंदाताई वाघ, मीरा वर्पे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, सुरेश थोरात, गणपत खेमनर, पांडुरंग घुले, दत्तू थोरात, सुभाष गुंजाळ, कार्यालयीन अधीक्षक शरद गुंजाळ आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा.चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सभासद ऊस उत्पादक शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान
थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम ऊस उत्पादक, सभासद यांचे हीत जोपासण्याबरोबर कामगारांच्या जीवनातही आनंद निर्माण केला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळीनिमित्त कारखान्याच्या सर्व कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.

