संगमनेर – अकोले तालुक्यातून पाच गुन्हेगार तडीपार !
पोलीस उपअधीक्षक यांची कारवाई

प्रतिनिधी —
विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेले संगमनेर अकोले तालुक्यातील पाच सराईत गुन्हेगार नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याचे आदेश संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी दिले आहेत.
या गुन्हेगारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये संगमनेर मधून चार जण तर अकोले तालुक्यातील राजूर येथील एक जण असे पाच सराईत गुन्हेगार हद्दपार करण्यात आलेले आहेत.
यामध्ये दरोडा, दंगा, घरफोडी, जबरी दुखापत, विनयभंग, वाळूचोरी इत्यादी असे विविध प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

संगमनेर तालुक्यातील हद्दपार केलेले चार गुन्हेगार पुढीलप्रमाणे राजेंद्र अंतु कोल्हे (रा. धांदरफळ) याच्यावर संगमनेर तालुका पोलीस स्टेशन मध्ये सहा गुन्हे दाखल आहेत या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत त्याला हद्दपार करण्यात आले आहे. सुनील वाळीबा घुगे (रा. निमोण) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस स्टेशनमध्ये तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. दीपक सोमनाथ पानसरे (रा. कोल्हेवाडी रोड) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. तनवीर कदीर शेख (रा. नाटकी) याच्यावर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तसेच अकोले तालुक्यातील राजूर येथील सचिन बाळू इदे याच्याविरुद्ध राजुर पोलीस स्टेशन मध्ये चार गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत.
या पाच जणांना संगमनेरचे उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी आज तडीपार केल्याची जाहीर केले आहे. या सर्वांना नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
Post Views: 70
