अर्पण रक्त केंद्रामध्ये सायबर गुन्हा जागृती कार्यशाळा संपन्न !
प्रतिनिधी —
सध्याच्या काळात सायबर सुरक्षा जागृती अत्यावश्यक आहे. सायबर क्राईम ही आंतरराष्ट्रीय समस्या झाली आहे. सर्वांनी याबाबत सावधगिरी बाळगावी. कुतूहलापोटी अथवा अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीमुळे फसगत होऊ शकते. त्यातून गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडू शकतो अथवा नुकसान होऊ शकते. यासाठी सर्वांनी इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडियाचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यातील अर्पण रक्त केंद्र येथे सायबर गुन्हा जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संगमनेर महाविद्यालयाच्या MSC (CA) या वर्गातील विद्यार्थ्यांनी ही कार्यशाळा घेतली. प्रमोद गांजवे व ऋतिक हासे या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, फोन पे, गुगल पे इत्यादींचा वापर सध्या सर्वच क्षेत्रात होत आहे. सर्वजण हे अॅप वापरत आहेत. याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी,ऑनलाइन भ्रष्टाचार, लोन फ्रॉड, फेस फोड, व्हाईस फ्रॉड यापासून सर्वांनी सावध कसे राहावे हे सांगण्यात आले. ओटीपी चा नेमका अर्थ काय आहे. तो इतरांना का देऊ नये, आपले विविध ॲप संबंधातील अकाउंट प्रायव्हेट ठेवावे. आपल्या ॲपचा पासवर्ड नेहमी स्ट्रॉग ठेवावा. डाऊनलोड करताना, परमिशन देताना कोणती काळजी घ्यावी. यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेस नयन जैन व प्रमिला कडलग उपस्थित होते. सर्वांनी या कार्यशाळेत उत्साहाने सहभाग घेतला.

