पोखरी हवेली येथे १८५ विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण 

प्रतिनिधी —

श्री संत गाडगेबाबा भानुप्रभाकार सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेली येथे १८५ विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. मुलांनी हसत खेळत आपली गुणवत्ता सिद्ध करावी अशा शुभेच्छा सखाराम माळी यांनी दिल्या. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सेवानिवृत्त प्रा. चं. का. देशमुख, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी परशराम पावसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे, उपाध्यक्ष संदीप खैरे आदि उपस्थित होते.

माळी म्हणाले कि, मुलांनी आपले भविष्य उज्वल करण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. यातूनच भारताचे सुजाण नागरिक घडणार आहेत. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख बक्षीसही माळी यांनी दिले. चं. का.देशमुख यांनी आपल्या संस्थेच्या कार्यात माझ्या विदयार्थ्यांचा मोठा वाटा असून त्यामुळेच मला हे मदत कार्य शक्य होत असून आत्तापर्यंत २०५ कार्यक्रम घेता आले आहेत अशी माहिती दिली. परशराम पावसे यांनीही मुलांना मौलिक मार्गदर्शन करून संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

इयत्ता पाचवी ते सातवीच्या ५० विदयार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक दिले तर इयत्ता पहिली ते चौथीच्या १३५ विदयार्थ्यांना सुलेखन पाटी देण्यात आली. शालेय परिसरातील पक्ष्यांना धान्य, तसेच पत्रलेखनासाठी मुलांना प्रवृत्त व्हावे म्हणून साध्या पत्राचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य हातात मिळताच मुलांचे चेहरे खुलले. सेवा प्रतिष्ठान गरजू कुटुंबियांच्या व विदयार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. याप्रसंगी तत्कालीन विद्यार्थी आर.जी. पावसे यांनी प्रतिष्ठानला आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त पाच हजार रुपयांची देणगी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी तर आभार प्रदर्शन आर.जी. पावसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश साळुंके, शकुंतला शेळके, दस्तगीर शेख, सखाराम पाटील, राजेंद्र सूर्यवंशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!