डी.क. मोरे जनता (सह्याद्री) विद्यालय वडगाव पान येथे योग दिन साजरा
प्रतिनिधी —
जागतिक योगदिनाच्या निमित्ताने डी.के. मोरे जनता (सह्याद्री) विद्यालय वडगाव पान येथे मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला.

1200 विद्यार्थ्यानी मेडिकल सिम्बॉल मध्ये मानवी साखळी तयार करून योगाची प्रात्यक्षिके केली. आज सर्व जगामध्ये योग दिन साजरा होतो आहे. नियमितपणे योगा केल्यास शारीरिक व्याधी, आजारापासून दूर राहता येईल. दवाखान्यापासून मानवाला लांब राहण्यासाठी योगाची नितांत गरज आहे. योगासने केल्यास मानवाचे शरीर सशक्त लवचिक व बलवान बनते याचाच प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मेडिकल सिम्बॉल च्या रचनेत मानवी साखळी तयार करून विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली.

ही संकल्पना विद्यालयातील क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर व कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांनी साकारली. त्यांना प्रा. भिमराज काकड, भारत सोनवणे सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. योगशिक्षक बाळासाहेब कांडेकर यांनी विद्यार्थ्यांना योगा प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी प्राचार्य साहेबराव कोल्हे, उपमुख्याध्यापक प्रताप आहेर, पर्यवेक्षिका संगिता रणशूर, ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज प्रा.बाबा गायकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव पानचे डॉ. गायकवाड, आरोग्य सेविका व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योग प्रात्यक्षिके केली. सूत्र संचालन पी.के. दये यांनी केले.
