संगमनेरात वि.हिं.प. दुर्गावाहिनी वतीने हळदी-कुंकूचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी —
सु संस्कृत पिढी घडवण्यात स्त्रियांचा मोठा वाटा असून आजच्या इंटरनेट व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मुलांवर धर्म संस्कार करण्याची जबाबदारी आईवर आली आहे. लव्ह जिहाद सारखी मोठी समस्या निर्माण झाली आहे, त्यासाठी दुर्गावाहिनीच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य सुरू असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी पश्चिम महाराष्ट्र संयोजिका अमृता नळकांडे यांनी यावेळी केले.
हिंदू सु- संस्कृती या विषयावर प्रबोधन करतांना त्या पुढे म्हणाल्या की, जसे जिजाऊ यांनी शिवराय घडवले तसेच संस्कार मुलांवर करण्याची गरज आहे.
विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी संगमनेरच्या वतीने तिळगुळ व हळदी-कुंकूचा कार्यक्रम चंद्रशेखर चौक येथील श्रीराम मंदिरात शनिवारी २९ जानेवारी रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात १०० ते १५० भगिनींनी सहभाग घेतला होता. यावेळी वाण म्हणून तुळशीची रोपे, रामरक्षा, हनुमानचालीसा, लव्ह जिहादची पुस्तके हळदी कुंकू कार्यक्रमानंतर देण्यात आली.

हिंदू धर्मामध्ये तुळशीला पूजनीय मानले जाते. प्रत्येक शुभ कार्यात तुळशीचे पूजन केले जाते. तुळशी पासुन सर्वात जास्त ऑक्सीजन भेटतो व पर्यावरण संरक्षण होते. घरातील वातावरण हे धार्मिक होवुन जाते. या बद्दल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली. दुर्गावाहिनी संगमनेर शहर संयोजिका गुंजन कर्पे यांनी त्रिवार ओमकार, एकात्मता मंत्र, विजय मंत्र व पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रेरणा कोदे यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार अस्मिता कर्पे यांनी केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तुळशीचे रोपे व पुस्तके उपलब्ध करून दिली. कार्यक्रमास दुर्गावाहिनीच्या कमलेश कर्पे, प्रतिभा माने, जयश्री कर्पे, शीला राहाणे, स्मिता वाकचौरे, ऋतिका बारड, प्रभावती कर्पे, भाजपाच्या सुरेखा खरे, प्राजक्ता बागुल आदी उपस्थित होत्या.
