महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच !

अमरावतीमध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या – १५२ दिवसांत १४३ आत्महत्या

प्रतिनिधी —

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नसून आत्महत्या करण्याचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. विदर्भातील अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. 152 दिवसात 143 शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

अमरावती हा कापूस आणि सोयाबीन शेतीचा भाग देखील आहे. जिल्ह्याच्या काही भागात प्रसिद्ध नागपूर संत्र्याची लागवड देखील केली जाते. यावर्षी मे महिन्यापर्यंत अमरावतीत 143 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यवतमाळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. 132 शेतकरी आत्महत्या. येथे झाल्या आहेत.

2021 पासून अमरावती मध्ये आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. अमरावतीमध्ये परिस्थिती विशेषतः गंभीर आहे. शेतकरी सोयाबीनकडे वळले, आणि उत्पादनात लक्षणीय घट झाली. बाजार भावही 4 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले. गेल्या वीस वरत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा आणि वर्धा. जिल्ह्यात २२ हजारांहून अधिक आत्महत्या झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात आत्महत्यांचे प्रमाण आहे.

आत्महत्या शेतीच्या संकटामुळे किंवा अन्य कारणांमुळे झाली आहे का याचा शोध जिल्हास्तरीय समिती करते. शेतकरी आत्महत्यांपैकी 76% शेतकरी आत्महत्यांना अधिकृतपणे कृषी संकट कारणीभूत ठरले असल्याची माहिती मिळते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!