संगमनेर तालुक्यात भला मोठा अजगर आढळला !

प्रतिनिधी —

मागील अनेक वर्षापासून प्रवरा नदी पट्यातील गावांमध्ये विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण वाढले आहे. अशातचं खळी (ता. संगमनेर) येथील भाऊसाहेब नागरे यांच्या शेतात भलामोठा अजगर (सुमारे 12 फुट लांब) निपचित पडलेला आढळून आला. त्यामुळे या अजगराला पाहून लोकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. आश्‍वी येथील सर्पमित्र शिवा पवार यांनी अजगराला ताब्यात घेतले.

खळी येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब नागरे यांच्या शेतात बुधवारी दुपारच्या सुमारास पुरुष, महिला हे शेत काम करत होते. सागर भाऊसाहेब नागरे या तरुणाला संशयास्पद हालचाल होताना दिसली. त्यामुळे त्यांने जवळ जाऊन पाहिले असता भला मोठा अजगर निपचित पडलेला आढळला. हा अजगर मेला असल्याचा भास झाल्यामुळे त्याने जवळ जाऊन पाहिले तर अजगराने भितीपोटी मोठ्याने फुत्कारला. त्यामुळे या तरुणाची चांगलीचं धांदल उडाली.

आवाज ऐकून शेतात काम करत असलेले लोकं त्या ठिकाणी आले आणि प्रसंगावधान दाखवत आश्‍वी येथील सर्पमित्र शिवा पवार यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन या अजगराला ताब्यात घेतले. तोपर्यत उपस्थित लोकांची भितीने गाळण उडाली होती.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!