महिलांसाठी विविध पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण
एकविरा फाउंडेशंनचा उपक्रम
प्रतिनिधी —
महिला सबलीकरण व सक्षमीकरण करणे हा एकविरा फाउंडेशनचा प्रमुख उद्देश डोळ्यांसमोर ठेवून एकविरा फाउंडेशनच्या वतीने यशोधन कार्यालयात महिलांसाठी विविध खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची वाटचाल सुरू असून डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून महिला व तरुणींसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम करण्यात आला आहे.
यशोधन कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेत महिलांना मनीषा शिंदे, मंगल कासार, सुनिता कांदळकर यांनी राजगिरा लाडू, अनारसे, चकली यांसह इतर खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक श्रीराम कुऱ्हे, पी वाय दिघे, अनिल सोमणी यांसह शितल उगलमुगले, दिपाली वर्पे, सुरभी मोरे प्राजक्ता घुले, अर्चना वनपत्रे, कमल अरगडे, दिपाली राहणे, रेखा फटांगरे, मनीषा ढमाले, मनीषा बागुल, रोहिणी कोटकर, आदिती खोजे, उज्वला तुपे, कविता दिघे, शैला वामन आदी महिला उपस्थित होत्या.
महिला सबलीकरण व सक्षमीकरण करणे हा एकविरा फाउंडेशनचा प्रमुख उद्देश असून महिला व युवतींना अगदी आपल्या घरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून घरगुती खाद्यपदार्थाची प्रशिक्षण एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यात राजगिरा लाडू, अनारसे, चकली यांसह विविध खाद्यपदार्थ कसे बनवावे त्यांची चव कशी वाढवावी याबाबत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी बोलताना श्रीराम कुऱ्हे म्हणाले की, डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या वतीने मागील काही दिवसांपूर्वी बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळावी यासाठी मार्केटिंग पद्धती ची कार्यशाळा आयोजित केली. याच मधून विविध बचत गटांच्या उत्पादित मालांना मोठी बाजारपेठ मिळाली आहे.
सुनीता कांदळकर म्हणाल्या की, डॉ. थोरात यांच्या संकल्पनेतून महिलांकरता विविध वस्तूंची निर्मिती आकर्षक पद्धतीने पॅकिंग, याचबरोबर ब्रॅण्डिंग आणि विक्री यासाठी मार्गदर्शन केले जात असून घरगुती पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या वस्तूंचे प्रशिक्षण दिले जात आहे. या पुढील काळातही विविध वस्तूंचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केले जाणार असून याकरता जास्तीत जास्त महिलांनी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरभी मोरे यांनी केले तर आभार सुनिता कांदळकर यांनी मानले. यावेळी अनेक महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.