मोटार सायकल चोरी करणारी टोळी पकडली

पाच महागड्या बुलेट सह इतर गाड्या हस्तगत

प्रतिनिधी —

मोटार सायकल चोरीने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात उच्छाद मांडला आहे. प्रत्येक तालुक्यात आणि शहरात दिवसभरात दोन-तीन घटना तरी घडत आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक गुन्हे शाखा नगरच्या पथकाने मोटार सायकल चोरी करणारे टोळी पकडली असून त्यांना अटक केली आहे. 11 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अनिल मोतीराम आल्हाट (वय – 23 वर्षे रा. श्रीगोंदा, अ. नगर),  हर्षद किरण ताम्हाणे (वय – 18 वर्षे रा. श्रीगोंदा, अ. नगर), निखील उद्धव घोडके (वय -18 वर्षे रा. श्रीगोंदा जि.अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींकडून खालील प्रमाणे मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

अ.नं. मोटार सायकल कंपनी, चेसी नंबर इंजिन नंबर

1) हिरो कंपनीची एच. एफ. डिलक्स  MBLHA11EPB9F01107 HA11EDB9F03313

2) रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट  ME3U3K5C0BK095361 U3K5COBK095361

3) रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट  ME3U3S5C1EL113159 U3S5C0EL577952

4) रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट  ME3U3S5C1HC824089 U3S5C1HC501875

5) रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट  ME3U3S5C0EE461890 U3S5C0EE461890

6) रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट  ME3U3S5C2KM786323 U3S5C2KM723181

7) सुझुकी ऍ़क्सेस  MB8DP11ABK8B83804 AF216037408

8) यामाहा कंपनीची सॅल्युटो  ME1RE1228F0014068 E3P1E0035869

9) हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर  04L16F44312 04L15E43460

10) होंडा कंपनीचे युनिकॉर्न  ME4KC315HKA123592 KC31EA1123621

तोफखाना, नगर तालुका, कर्जत, लोणीकंद पुणे, विश्रांतवाडी पुणे येथील गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, विशाल तनपुरे, अमोल कोतकर, संतोष खैरे, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!