थर्टीफर्स्टला कळसूबाई, हरिश्चंद्र गडावर मुक्कामास बंदी !

प्रतिनिधी —

अभयारण्यातील कळसूबाई कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, रतनगड, सांदण व्हॅली यासह अनेक ठिकाणी वनक्षेत्रात पर्यटक मुक्काम करून नववर्षाचे स्वागत करत असतात. यंदा मात्र या गड किल्ल्यावर रात्री मुक्काम करता येणार नाही.

वन विभागाने ३० आणि ३१ डिसेंबर रोजी कळसूबाई अभयारण्य परिसरात मुक्काम करण्यास बंदी घातली आहे. आपण या ठिकाणी दिवसा भेट देता येईल.

भंडारदरा धरण परिसरात असलेल्या गड किल्ल्यावर ३० आणि ३१ तारखेला मुक्काम करता येणार नाही. कळसूबाई शिखरावर नवं वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते, परंतु गड किल्ल्याचे पावित्र्य दूषित होऊ नये व दारू पिऊन अपघात तसेच अस्वच्छता, पर्यावरणास हानी, निसर्गाचे नुकसान होऊ नये म्हणून वन विभागाने बंदी घातली आहे.

गडावर जाऊन कोणत्याही पर्यटकांनी मद्यपान करू नये तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच या दोन्ही दिवशी पोलीस आणि वनविभागाकडून सदर परिसरात पेट्रोलिंग करण्यात येणार आहे व पर्यटकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

कळसूबाई अभयारण्य परिसरात रात्री गड किल्ल्यावर मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली असून, कोणत्याही प्रकारे गडावर मुक्कामाला जाण्याचा आग्रह करू नये, असे आवाहन ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!