”छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता.”
आमदार रोहित दादा पवार यांच्या ट्विटने चर्चेला उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानकपणे मेट्रो मधून प्रवास करून पाहणी केल्याने राजकीय क्षेत्रात एकच गडबड गोंधळ उडालेला असताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया टीकाटिप्पणी सुरू झाल्या आहेत.
कर्जत – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित दादा पवार यांनी या बाबत सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटवरून देखील बराच गदारोळ वाढला असून विविध प्रतिक्रिया चर्चांना उधाण आले आहे.

त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचे एक वाक्य टाकले असून या वाक्यामुळे विरोधकांना अधिकच टोमणे आणि कानपिचक्या लगावले असल्याचे बोलले जात आहे. आमदार रोहित पवार यांच्या ट्विटर अकाउंट वर या ट्विटवरून प्रतिक्रियांचा पाऊस पडत असला तरी हे ट्विट मात्र बरेच काही सांगून गेले आहे.
पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की,
आदरणीय पवार साहेबांनी मेट्रोची पाहणी केली म्हणून लगेच मेट्रोवर हक्कभंग आणण्याची भाषा?
यास भीती म्हणावी की संकुचित मनोवृत्ती?
असो!
स्व. अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते….
”छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता.”
एवढेसे हे छोटेखानी ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.
