काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करावी ;

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी 

प्रतिनिधी–

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काॅग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान काॅग्रेस पक्षाच्या नेत्यांना राहीलेले नाही. त्यांच्या वक्तव्याची दखल घेवून तातडीने कारवाई करावी आशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार विखे पाटील म्हणाले की, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य म्हणजे पक्षाच्या खालवलेल्या वैचारीक पातळीचे द्योतक असून, पंजाब मध्ये पंतप्रधानाचा ताफा जाणीवपूर्वक अडकवून ठेवत काॅग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपल्या संकुचित मनोवृतीचे दर्शन घडवले. त्यानंतर काॅग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्य पाहीली तर या पक्षाची वाटचाल किती दिशाहीन झाली आहे याकडे आमदार विखे पाटील यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची घोडदौड वेगाने सुरू आहे. कोव्हीड संकटानंतरही देशाच्या अर्थव्यवस्थेला पुर्वपदावर आणण्यात पंतप्रधानांना मिळालेले यश महत्वपूर्ण आहे. सामान्य माणसाला योजनांचा थेट लाभ मिळत असल्याने कुठेही टिका करायला संधी नाही. मोदीजीचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्याचे सहन होत नसलेल्या काॅग्रेस नेत्यांना आपले अस्तित्व दाखविण्यासाठी मोदीजींच्या विरोधात बोलण्याची धडपड देशात सुरू केली आहे. परंतू जनाधारच कुठे मिळत नसल्याने असे वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहाण्यापलीकडे कोणतेही काम आता काॅग्रेस पक्षाच्या नेत्यांना राहीले नसल्याचा टोला आमदार विखे पाटील यांनी लगावला.

राज्यातही आघाडीमध्ये काॅगेस पक्षाला निर्णय प्रक्रियेत कुठेही स्थान दिले जात नाही. त्यामुळेच नैराश्येच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान त्यांना राहीलेले नाही आशा शब्दात आमदार विखे यांनी मोदीबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मोदीबद्दल केले गेलेले वक्तव्य अतिशय गंभीर असल्याने याची गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी आशी मागणी आमदार विखे पाटील यांनी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!