वंचित कुटुंबियांसाठी दिवाळीचा फराळ ;
आधार फाउंडेशनचा उपक्रम
प्रतिनिधी —
आधार फाउंडेशन परिवाराने दिवाळीच्या दिवशी लमाण तांडा (लोहारे मिरपूर), गोलवड वस्ती (कुरण), बर्डे वस्ती (सोनुशी), बिरेवाडी, माळी वस्ती (निळवंडे), हिवरगाव पावसा टोल नाका आदि ठिकाणच्या एकूण २०० कुटुंबियांना दिवाळी फराळ, मिठाई व साड्यांचे वाटप केले असल्याची माहिती सोमनाथ मदने यांनी दीली.

सर्वत्र दिवाळीचा उत्साह, आनंदोत्सव सुरू असतो. घराघरात- दारादारात, अंगणात दिवाळीचे दिवे मिणमिणत असतात. पण आपल्या आसपास काही कोपरे असे असतात जिथे अंधार असतो. असे काही कुटुंब मात्र या उत्सवापासून वंचित असतात. अशा वंचितांच्या, भटकंती व मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तींच्या झोपडीवर जाऊन आधार फाउंडेशन परिवाराने दिवाळीच्या दिवशी सकाळी दिवाळी साजरी केली. असे त्यांनी सांगितले.

लमाण तांडा(लोहारे मिरपूर), गोलवड वस्ती(कुरण), बर्डे वस्ती (सोनुशी), बिरेवाडी, माळी वस्ती (निळवंडे), हिवरगाव पावसा टोल नाका आदि ठिकाणच्या एकूण २०० कुटुंबियांना दिवाळी फराळ, मिठाई व साड्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी पी.आर.शिंदे, प्रा.किसन दिघे, भानुदासआभाळे, किसन हासे, सुशिला हासे,
दीपक कर्पे, सुभाष पाराशर, धोंडिभाऊ गुंजाळ, निवृत्ती शिर्के, देविदास गोरे, रामदास सोनवणे, सुभाष ताजणे, संजय अभंग, सचिन कानवडे, सखाराम तळपाडे, आदिसह प्रत्येक वस्तीवरील सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रकल्प प्रमुख तान्हाजी आंधळे यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. वंचितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दिड किलो दिवाळी फराळ-लाडू, करंजी, शेव-चिवडा, चकली, बाकरवडी, प्रत्येक माता-भगिनींना साडी व बाळगोपाल मंडळीस खाऊ मिळाल्याने कुटुंबियांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. आधारच्या सर्व क्षेत्रातील देणगीदारांच्या दातृत्वातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आधारच्या दिवाळी उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. घासातला घास वंचितांसाठी देऊन आधार परिवाराने समाजासाठी एक आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन सुभाष पाराशर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी. डी. वाकचौरे, राजू रहाणे, आर.जी.पावसे, दस्तगीर शेख, सुरेश साळुंके, रमेश डोंगरे, कैलास वराडे, आदित्य कोते, संतोष शेळके, मनोहर यादव, मच्छिन्द्र पावसे, मंदा कडलग, नामदेव इल्हे, अविनाश वाकचौरे, विजय फापाळे, सुभाष वारुंक्षे यांसह सर्व आधार समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले.

