सर्वरोग निदान शिबीराचा रूग्णांनी घेतला लाभ

लायन्स क्लब संगमनेर सफायरचा उपक्रम 

प्रतिनिधी — 

लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीने श्रमशक्ती विद्यालय, मालदाड येथे नुकतेच सर्वरोग निदान शिबीर पार पडले. या शिबिरामध्ये २५० पेक्षाही जास्त रूग्णांनी सहभाग नोंदविला. या सर्व रूग्णांची तपासणी मोफत करण्यात आल्याची माहिती क्लबचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी दिली.

श्रीनिवास भंडारी, डाॅ.अनुजा सराफ, रोहित मणियार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. संगमनेर सफायरचे अध्यक्ष अतुल अभंग, जितेश लोढा, कल्पेश मर्दा, उमेश कासट, कल्याण कासट, ओम इंदाणी, यश मेहता, सम्राट भंडारी, सुमित अट्टल, सागर मणियार, नामदेव मुळे, अमोल भरीतकर यांनी या शिबीरासाठी विशेष प्रयत्न केले.

तालुक्याच्या ग्रामिण भागातील मालदाड येथे असलेल्या श्रमशक्ती विद्यालयात या शिबिराच्या नियोजनासाठी सुर्यभान नवले यांनी विशेष प्रयत्न घेतले.

हृदयरोग व श्वसनविकार तज्ज्ञ दिग्विजय शिंदे, नेत्ररोग तज्ज्ञ निलेश देशमुख, पॅथेलाॅजी विभाग डाॅ. मधुरा पाठक, दंतविकार तज्ज्ञ डाॅ. केदार व डाॅ. अनुजा सराफ, स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. अमित व डाॅ. प्रियंका ताजणे, किडनीविकार तज्ज्ञ डाॅ. हृषिकेश वाघोलीकर, अस्थिरोग तज्ज्ञ डाॅ. विजय पटेल, पोटविकार तज्ज्ञ डाॅ. नैमिष सराफ, मुळव्याध व भगंदर तज्ज्ञ डाॅ. सुहास अवस्थी यांनी मोफत रूग्णसेवा करत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

ग्रामिण भागामध्ये आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. आजार बळावल्यानंतर शहरामध्ये येऊन त्यावर उपचार केले जातात. यावेळी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो आणि कधी कधी रूग्णाला जीव गमवावा लागतो. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब संगमनेर सफायरने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या निमित्ताने ग्रामिण भागातील रूग्णांसाठी या सर्वरोग निदान शिबिराचे खास आयोजन केले होते. यावेळी रक्तगट तपासणी आणि रक्तदान शिबीराचे आयोजनही करण्यात आले होते.

या सर्वरोग निदान शिबीरातून रूग्णांच्या तपासण्या झाल्याने पुढील उपचार घेण्यासाठी मोठी मदत झाली आहे. शिबीराच्या यशस्वीततेसाठी लायन्स संगमनेर सफायरच्या सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!