कळसुबाई शिखरावर २७ वर्षांपासून घटस्थापना !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक अखंडितपणे २७ वर्षांपासून राज्यातील सर्वोच्च शिखरावर घटस्थापना करतात. त्यांच्या कार्याची दखल घेत “सबका मालीक आत्मा” या संस्थेचे परम पूज्य जंगलीदास महाराज व त्यांचे शिष्य परमानंद महाराज यांनी घटकलशाचे पूजन करून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्याकडे घटकलश सुपूर्द केला.

कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी त्या घटकलशाचे मोठ्या भक्ती भावाने राज्यातील सर्वोच्च असलेल्या कळसुबाई शिखरावर सालाबादप्रमाणे पहाटेच चढाई करून मातेचा दुग्धअभिषेक, आरती करून मंदिरात घटस्थापना केली.

या स्तुत्य उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, निलेश आंबेकर, सोमनाथ भगत, निलेश पवार, प्रवीण भटाटे, काळू भोर, रमेश हेमके, नितीन भागवत, संजयमंत्री जाधव, उमेश दिवाकर, ज्ञानेश्वर मांडे, बाळू आरोटे, नामदेव जोशी, इंदिरा जाचक, सुमित्रा मराडे, रेखा भटाटे, चेतन जाधव, अशोक हमके,सोनू गीते, बाळासाहेब वाजे, गजानन चव्हाण, चेतन जाधव सर्व बालगोपाल, तरुण तसेच इतर गिर्यारोहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

