महामार्गाच्या कामाचे केवळ श्रेय लाटण्यासाठी घाई घाईत सुरू केलेले पथदिवे बंद कसे पडले ?

भाजपचे अमोल खताळ यांचा आमदार थोरात यांना सवाल

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे नाशिक महामार्गाच्या कामाचे केवळ श्रेय लाटण्यासाठी अर्धवट कामाच्या उद्घाटनाचा हट्ट केल्यामुळे महामार्गावरील पथदिवे दिवे उद्घाटनानंतर लगेच बंद पडले आहेत. अधिकारी, ठेकेदार यांना वेठीस धरून आपण दिवे कसे चालू करायला लावले हे जनतेन उघड्या डोळ्यांनी पाहीले आहे. अशी टिका भाजपचे कार्यकर्ते अमोल खताळ यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे.

यापुर्वी सुध्दा गावात बसविलेल्या सिग्नलचे पुढे काय झाले ? जनतेचा पैसा कसा वाया गेला ? हे सुध्दा जनतेन उघड्या डोळ्यांनी पाहीले असल्याची आठवण खताळ यांनी करून दिली.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात अमोल  खताळ यांनी म्हणले आहे की, जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून विखे पाटील यांनी एक वर्षापुर्वी जबबादारी स्विकराली तुम्ही तर चाळीस वर्षे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात. प्रत्येक प्रश्नाचे खापर विखे पाटील यांच्यावर फोडल्याने तुमचे अपयश झाकले जाणार आहे का असा सवालही खताळ यांनी उपस्थित केला आहे.

मालदाड रस्त्याचा प्रश्न एका दिवसात निर्माण झालेला नाही. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची समस्या आहे. पण लोकप्रतिनीधीनी तालुक्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहीले नसल्यानेच ग्रामीण भागातील रस्त्यांचे सर्वच प्रश्न ऐरणीवर आले आहेत. प्रश्न सोडविता न आल्याची उतर जनता आता थोरांताकडे मागू लागल्याने केवळ विखे पाटील यांच्याकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याचे धोरण सुरू असल्याची टिका खताळ यांनी केली.

संगमनेर मालदाड रस्त्याकरीता अडीच वर्ष आघाडी सरकार असतानाही तुम्ही कामाची सूरूवात करू शकला नाही. राज्यात युती सरकार आल्यानंतरही तुम्हाला निधी उपलब्ध करता आला नाही. केवळ निधीला स्थगिती दिल्याचे कारण सांगून वेळ मारून नेण्याची तुमची पध्दत तालुक्यातील जनतेने चांगली ओळखली असल्याने विखे पाटील यांच्यावर तुमच्याकडून होत असलेल्या आरोपावर आता  कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही.

भोजापूर धरणातून मंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने पाणी सोडण्यात आले.त्यावरही चाळीस वर्ष नियोजनाचा आपण केलेला दावा आश्चर्यकराक वाटतो. सर्व सत्तास्थान हातात असताना लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला भोजापूरचे पाणी आपण मिळू दिले नाही. मंत्री विखे यांच्या कार्यक्षेत्रात हा प्रश्न नसताना सुध्दा शेतकऱ्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत त्यांनी न्याय मिळवून दिल्याकडे लक्ष वेधून खताळ म्हणाले की, निळवंडे धरणाचे पाणी दिलेच पण भोजापूरचे सुध्दा आणून दाखवले ही वस्तूस्थिती तालुक्याला आता समजल्याने विखे पाटील यांना तालुक्यात मिळत असलेला प्रतिसाद पाहून तुमची अस्वस्थता वाढत आहे. प्रत्येक गोष्टीत विखेवरचा आरोप म्हणजे तुमचे अपयश उघड  होण्यासारखे असल्याचे खताळ  म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!