कोल्हेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात बहिण-भाऊ जखमी
प्रतिनिधी —
सायंकाळच्या वेळी बहिण-भाऊ मोटरसायकल वरून घरी जात असताना घराजवळच उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला करून जखमी करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात घडली आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून बहिणीला जास्त जखमा झाल्याने तिला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
प्रवीण नरोडे आणि पूजा नरोडे असे जखमी झालेल्या बहीण-भावंडांचे नाव आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की. कोल्हेवाडी येथील नरोडे मळ्या मध्ये राहणारे प्रवीण नरोडे त्याची बहीण पुजा नरोडे हे दोघे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता संगमनेर येथून घरी परतत असताना घराच्याजव आलेअसता अचानक उसाच्या शेतात दबा धरून बस लेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेऊन हल्ला केला.
यावेळी ते दोघे भाऊ बहीण गाडीवरून खाली पडले, अन बिबट्या त्यांच्या अंगावर धावून गेला असता दोघा नीही मोठ्या मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून उसात लपला.
परंतु पुन्हा त्याने अचानक दोघांवर हल्ला करून पूजा नरोडे हिचा पायाला चावा घेत जखमी केले. प्रवीण याला बिबट्यााची नखे लागल्याने तो जखमी झाला.
दोघा बहिण भावाला उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले, मात्र बहीण पूजा ही जास्त जखमी असल्यामुळे तिला पुढील उपचारा साठी नाशिक येथे नेण्यात आले.
बिबट्याने हल्ला केला असल्याची माहिती मिळताच संगमनेर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या या परिसरामध्ये अजूनही लपून बसला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन नंदू दिघे, उपसरपंच संजय कोल्हे माजी सरपंच जालिंदर दिघे, मोहन बाबा वामन, अमोल कोल्हे व नरोडे मळा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
