चॅप्टर केसेस मधील प्रतिबंधक कारावयांमध्ये सात जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
पोलीस स्टेशनला 5 पेक्षा जास्त दाखल असलेल्या गुन्हेगारांचे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्रीरामपुर शहर, राहुरी, कोपरगाव शहर, शिर्डी, लोणी पोलीस स्टेशन यांचे मार्फतीने हददीतील विविध पोलीस स्टेशन कडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 129 खाली चांगल्या वर्तणुकीसाठीचे प्रस्ताव अर्थात चॅप्टर केसेस कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर यांचेपुढे पाठविण्यात आले होते. सोमनाथ वाघचौरे, कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर यांनी सदर प्रकरणी सुनावणी घेऊन सुनावणी अंती खालील पोलीस स्टेशन यांनी पाठविलेल्या प्रस्तावातील 7 गैरअर्जदार / प्रतिवादी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

अ.नं. पोलीस स्टेशन न्यायालयीन कोठडीत पाठवीलेल्या गैरअर्जदार/प्रतिवादी यांची नावे गैरअर्जदार/प्रतिवादी यांचेवर दाखल गुन्हयांची संख्या
1 श्रीरामपुर शहर मनोज संजय सांबळे, वय-25 वर्षे रा. साईमंदिर जवळ, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर 7
2 श्रीरामपुर शह रामप्रसाद रत्नाकर वांदे वय- 28 वर्षे रा. डावकर रोड, वार्ड नं.5 श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर 5
3 श्रीरामपुर शहर दिपक बबन जाधव वय-25 वर्षे रा. कांदामार्केट, वार्ड नं.6 श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर 6
4 राहुरी लक्ष्मण सोपान दळे, वय- 39 वर्षे, रा. कुंभार गल्ली, राहुरी बु ाा, ता.राहुरी 5
5 कोपरगाव शहर अरबाज माजिद कुरेशी, वय- 25 वर्षे, रा. संजयनगर, कोपरगांव, ता. कोपरगाव 6
6 शिर्डी उदय आप्पासाहेब गायकवाड, वय -20 वर्षे रा. बाजारतळ, शिर्डी, ता.राहाता 4
7 आश्वी लखन साहेबराव मदने, वय -27 वर्षे रा. आश्वी, ता.संगमनेर 8

यापैकी काही गैरअर्जदार/प्रतिवादी यांनी बंधपत्र करुन देण्यासाठी जामीनदार हजर केले नाही तर काही गैरअर्जदार/प्रतिवादी यांनी बंधपत्र केल्यानंतर पुन्हा बंधपत्राचे उल्लंघन करुन पुन्हा नव्याने गुन्हे केले आहेत.
जेव्हा एखादा व्यक्ती दोन वर्ष, तीन वर्षांसाठी कार्यकारी दंडाधिकारी यांचेपुढे बंधपत्र करुन देतो, तेव्हा त्याने बंधपत्राच्या कालावधीत पुन्हा कोणताही गैरप्रकार व गुन्हा करणे अपेक्षित नसते. तसे केल्यास तो बंधपत्राचा भंग करतो व त्याचेवर बंधपत्र उल्लंघनाची कारवाई सुरु होते. तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांचेपुढे जर योग्य व सक्षम जामीनदार हजर करण्यास कसुर केल्यास त्यांचीही कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करतात. वरील पोलीस स्टेशन हद्दीतील सामनेवाले यांनी बंधपत्राचे उल्लंघन केल्याने व बंधपत्राच्या कालावधीत गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाल्याने 7 व्यक्तींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे.
