पुणे नशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार..

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील पूणे नाशिक महामार्गावरील चांदनापुरी घाटात आज पहाटे टेम्पोला अचानक भीषण आग लागल्याने द बर्निंग ट्रकचा थरार येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांनी अनुभवला.

महामार्ग पोलिसांनी आणि पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली असून ट्रक विझविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

या महामार्गावर हॉटेल साईप्रसादच्या समोर टेम्पो क्रमांक एम. पी. ३६ एच ०७९५ हा पुणे-नाशिक मार्गावर घेऊन पुण्याकडे जात असताना पाठीमागच्या बाजूने अचानक पेटला.

मागच्या बाजूने अचानक आग लागल्यानचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी सदर ट्रक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन आग विझविण्याचे काम सुरू केले. या अचानक लागलेल्या आगीत कोणीही जखमी झालेेल नाही. नाशिक पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून चालू आहे. घटनास्थळी घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील घटनास्थळी हजर होते.

संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवली आहे.

महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर आहेत. या टेम्पो मधून मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका नेण्यात येत असल्याचे समजले असून या सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!