आश्वी बुद्रुक येथे बिबट्याचा १४ वर्षीय मुलावर हल्ला

आश्वी सह परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या

प्रतापपूर येथिल तरुण थोडक्यात बचावला

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथील महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे १४ वर्षीय मुलावर बुधवारी सकाळी तर प्रतापपूर येथे ३६ वर्षीय तरुणावर सोमवारी सांयकाळी बिबट्याने प्राणघातक हल्ला करत जखमी केल्यामुळे आश्वी सह पंचक्रोशीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या हल्ल्याच्या घटनामुळे आता बिबट्याचा बदोबस्तं करण्याची गरज निर्माण झाल्याचे म्हणत नागरीकानमधून संताप व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आश्वी बुद्रुक – निमगावजाळी रस्त्यालगत जिल्हापरिषद सदंस्या अँड. रोहिनी किशोर निघुते याची वस्ती व संजय कुलथे याच्या शेतीलगत विकास (विजय) गायकवाड याची वस्ती आहे. सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचा १४ वर्षाचा मुलगा प्रतिक हा जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात चालला होता. त्यावेळी शिकारीच्या शोधात झुडपात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने प्रतिकवर हल्ला करत डोके, कान व डोळ्याजवळ खोलवर गंभीर जखमा केल्या. यावेळी प्रतिकने बिबट्याचा जोरदार प्रतिकार करत आपली सुटका करुन घेत घराकडे धाव घेतली. त्यामुळे प्रतिकचा भाऊ तेजस गायकवाड व गौरव गायकवाड यानी तात्काळ त्याला उपचारासाठी लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यामुळे या जीवघेण्या हल्ल्यातून दैव बलवत्तर म्हणून प्रतिकचे प्राण वाचले आहेत.

तर प्रतापपूर येथे घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत नसीर पठाण हा तरुण सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रतापपूरहून दाढच्या दिशाने आपल्या दुचाकीवरुन चालला होता. यावेळी म्हसोबा मंदिरालगत असलेल्या कुरणामध्ये शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने नसीर पठाण याच्यावर हल्ला केला. त्यामुळे तो तरुण दुचाकीवरुन खाली कोसळला असता बिबट्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत करुन पुढे येण्याचा प्रयत्न केला असता नसीर पठाण याने मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या घाबरुन झुडपात निघून गेला.

यावेळी घाबरलेल्या नसीर याने स्वता:ला सावरत निमगावजाळी आरोग्य केद्रांत जाऊन घडलेली हकीकत सांगतली. यानतंर त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन नगर येथिल जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

दरम्यान नसीर याची तब्येत आता बरी असून आश्वी सह परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने बिबट्याचा बदोंबस्त करुन नागरीकाची दहशतीतून मुक्तता करावी. अशी मागणी आश्वी बुद्रुक चे सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, शिवाजी श्रावण गायकवाड, रामनाथ जऱ्हाड, संजय कुलथे, प्रतापपूरचे सरपंच दत्तात्रय आंधळे, उपसरपंच संगिता आव्हाड, शिवनेरी उद्योग समुहाचे शिवाजीराव इलग, पोलीस पाटील विठ्ठल आंधळे, दिलिप आंधळे, भिकाजी सांगळे, शंकर खामकर, सतिष आंधळे, संदीप आंधळे, संजय फड, कैलास आंधळे, अजय आंधळे, पांडुरंग आंधळे, शंकर आंधळे, सुदाम आंधळे, ज्ञानेश्वर आंधळे, जितेंद्र इलग, राहुल सांगळे, गणेश आंधळे, गणेश सांगळे, संदीप नागरे, हरिभाऊ वाघ आदिसह परिसरातील नागरीकानी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!