राजवर्धन युथ फाऊंडेशन च्या नामदार चषकात आयपीएलचा थरार !

आयपीएल व रणजी खेळाडूंच्या उपस्थिती षटकार, चौकारांची आतषबाजी
प्रतिनिधी —
राजवर्धन युथ फाउंडेशन च्या वतीने राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या नामदार चषक स्पर्धेत यावर्षी आयपीएल व रणजी मधील खेळाडू सहभागी झाले असून अद्यावत क्रीडांगण, लाईट व्यवस्था यांसह फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशा यामुळे संगमनेरकर व प्रेक्षक आयपीएलचा थरार अनुभवत आहेत.

कोल्हेवाडी फाटा येथे राजवर्धन युथ फाउंडेशन च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नामदार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या उपस्थित झाले असून दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, बाबा ओहोळ, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, बाबासाहेब कांदळकर, सुभाष सांगळे,केके थोरात सह विविध पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत..

यावर्षी या स्पर्धेत आयपीएलच्या धर्तीवर सोळा टिम करण्यात आल्या आहेत. यामध्ये त्रिमूर्ती वडगाव, राजे उमाजी नाईक वेल्हाळे, आदर्श साई रत्न राजापूर, महेंद्र गोडगे 11, राहुल राऊत 11, शिरसाठ स्पोर्ट, साई ट्रेडर्स, अजय फटांगरे युवा मंच, कोळवाडे, लक्ष्मी मात मनोली, स्वर्गीय बाबा पाटील युवा मंच साकुर,मोरया वॉरियर्स, कुरण, छावा सुकेवाडी आणि आयुष 11 या 16 संघांचा सहभाग आहे.

या स्पर्धेसाठी राजवर्धन युथ फाउंडेशन च्या वतीने जय्यत तयार करण्यात आली असून भव्य स्टेज सह सर्व मैदानावर लाईट व्यवस्था, आकर्षक सजावट, ढोल-ताशांची आतिषबाजी, प्रेक्षक गॅलरी यामुळे रात्रीच्या रंगणाऱ्या या स्पर्धांमध्ये आयपीएलच्या थरार प्रेक्षक अनुभवत आहेत..
स्पर्धेच्या आयोजनासाठी सिद्धार्थ थोरात, संतोष शेरमाळे, सुनील बांगर, अक्षय बांगर, संदीप गडाख, सनी अभंग, संकेत आव्हाड, सौरभ कडलग, सोहेल पिंजारी, बाबरशेख, रियाज शेख, आलि तांबोळी, संकेत घुगरकर, प्रशांत अभंग, अण्णा केदारी, शुभम पाबळ, दत्तू पोकळे, नागेश आव्हाड, पांडुरंग खेमनर, साहिल शेख आदींसह तरुण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Do you also have newspaper FACILITIES other than online?
संगमनेर तालुक्यातील बातम्यांचे लेखन अतिशय दर्जेदार आहे.बातमीपत्र वस्तुनिष्ठ असून परिपूर्ण माहिती देणारी आहे.अशाच प्रकारे बातमीपत्र प्रकाशित करत राहावे.धन्यवाद 💐🙏