काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ
प्रतिनिधी —
काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आणि प्रशिक्षण कार्यक्रम काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला.
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या या प्रशिक्षणासाठी सभासद नोंदणी मोहिमेचे राष्ट्रीय संयोजक के. राजू यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
काँग्रेसचा विचार हा देशाच्या प्रगतीचा आणि माणसाच्या उन्नतीचा आहे. सभासद नोंदणी मोहिमेच्या माध्यमातून आम्ही संविधानाने सांगितलेला हा समतेचा विचार घेऊन जनसामान्यांपर्यंत जाऊ आणि काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत करू असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहु कानडे, आमदार हिरामण खोसकर आदिंसह नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
