आर्थिक संकटातही महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना २५ हजार कोटींची मदत – महसूल मंत्री थोरात

सततचे कष्ट व संघर्ष यातून संगमनेर तालुक्याचा विकास –

निमज – वाडापूर पुलामुळे पश्चिम भागातील गावांना वाहतुकीची मोठी सोय

 प्रतिनिधी — 

दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा संगमनेर तालुक्याने पाण्यासाठीचा मोठा संघर्ष केला. १९८५ पासून सतत व अविश्रांत केलेले काम व पाण्यासाठीचा संघर्ष आणि सर्वांचे एकत्रित कष्ट यामुळे संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल ठरले ठरला आहे. कोरोनासह विविध संकटातही महा विकास आघाडी सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला असून शेतकऱ्यांसाठी सुमारे २५ हजार कोटींची मदत केली असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील निमज येथे निमज- वडापूर या सहा कोटी रुपये निधीतून उभारलेल्या पूलाचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांचे लोकार्पण  थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, या विभागाचे जि. प. सदस्य रामहरी कातोरे, लक्ष्मणराव कुटे, शेतकी संघाचे उपाध्यक्ष संपतराव डोंगरे,  मीराताई शेटे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, संतोष हासे, निषाताई कोकणे, विष्णुपंत रहाटळ, पांडुरंग घुले, जिजाताई शिंदे, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, अनिल काळे, विनोद हासे, आत्माराम हासे, सुहास आहेर, विलास कवडे, सरपंच गोरख डोंगरे, विलास कासार, विवेक कासार, रामनाथ डोंगरे, अरुण गुंजाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी संगमनेर ते सावरचोळ या रस्त्याच्या डांबरीकरण मजबुतीकरण कामाचा शुभारंभ, विविध रस्त्यांच्या कामाचे लोकार्पण व वाडापूर निमज या पूलाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा दुष्काळी तालुका होता. मात्र तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी केलेला पाण्यासाठीचा संघर्ष आणि त्याला दिलेली कार्यकर्त्यांनी साथ यामुळे तालुक्यात पाणी पुरवठा संस्थांचे जाळे उभे राहिले. त्यातून अनेक कार्यकर्ते घडले. आज राज्यातील सर्वात चांगला कार्यकर्त्यांचा संच असलेल्या संगमनेर तालुका आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेने सातत्याने आपल्यावर प्रेम केले. त्यामुळे विधानसभेत सलग आठ वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पस्तीस वर्षे अविश्रांत काम केले. निळवंडे धरण पूर्ण झाले आहे. कालव्याची कामे कोरोना संकटातही वेगाने सुरू आहेत. या कालव्यांद्वारे दुष्काळी भागाला पाणी देणे हेच आपले ध्येय आहे. मोठे कष्ट व संघर्षातून तालुका विकसित व वैभवशाली झाला आहे. तालुक्यातील सर्व सहकारी संस्था ह्या इतरांना दिशादर्शक आहेत. शिखर संस्था व गावोगावच्या सहकारी संस्था यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.

तालुक्यातील ग्रामीण पतसंस्थांमध्ये २१०० कोटींच्या ठेवी आहेत, हे समृद्धीचे प्रतिक आहे. मात्र ही वैभवशाली परंपरा आपल्याला जपायची आहे.
महाविकास आघाडी सरकारने कोरोना, नैसर्गिक संकटे, चक्रीवादळे, अशातही सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा दिला असून शेतकऱ्यांसाठी सुमारे २५ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. शेतकऱ्यांना मदत करणे हेच या सरकारचे काम असून कोरोना संकटात पूर्ण पारदर्शकपणे काम केले आहे.

तर आमदार डॉ तांबे म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत असलेल्या संगमनेर तालुका आहे. सहकार, शिक्षण, आर्थिक समृद्धी, शेती अशा विविध क्षेत्रात संगमनेर तालुका हा इतरांसाठी मॉडेल ठरला आहे. थोरात हे राज्यात काम करत असले तर ग्रामीण भागातील प्रत्येक गावाच्या विकासावर त्यांचे लक्ष असल्याचे ते म्हणाले.

जि.प सदस्य रामहरी कातोरे म्हणाले की, तालुक्यातील पश्चिम भाग हा कायम थोरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून सावरचोळ ते संगमनेर हा महत्त्वपूर्ण  रस्त्यासाठी  थोरात यांनी मोठा निधी दिला आहे. वाडापूर ते निमज या पुलामुळे वाहतुकीसाठी सोय होणार असून चिखली- वाडापूर, निमज आणि पश्चिमेकडील गावे संगमनेरशी जोडली जाणार आहेत. विकास कामांचा वेग कोरोना संकटकाळी कायम ठेवला असल्याचे ते म्हणाले.

यावेळी माधवराव हासे, सुदाम महाराज कोकणे, तुकाराम गुंजाळ, गंगाधर डोंगरे, दिलीप कासार, रामचंद्र शेटे, विजय गुंजाळ, गोरख डोंगरे, मंगेश मतकर, सागर डोंगरे, संतोष डोंगरे ,शिवाजीराव फटांगरे, निलेश शिंदे, बाळासाहेब कासार, सुरेखाताई बिबवे, अर्चनाताई बालोडे, सुरेश मतकर, दत्तू कोकणे, मुख्याध्यापक भारत कुटे, निखिल कातोरे, बिडीओ अनिल नागणे, सौरभ पाटील, विविध संस्थाचे पदाधिकारी व युवा प्रतिष्ठान कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकी संघाचे उपाध्यक्ष संपतराव डोंगरे यांनी केले तर सूत्रसंचालन भारत कुटे व नामदेव कहांडळ यांनी केले. अविनाश बिबवे यांनी आभार मानले.

युवा प्रतिष्ठानचे कौतुकास्पद काम

निमज येथील युवा प्रतिष्ठानने गावातील युवकांच्या वाढदिवसाचा खर्च न करता ती रक्कम गावातील वनराई वाढवण्यासाठी व सामाजिक कार्यासाठी वापरली आहे. यातून गावांमध्ये तीन हजार वृक्ष उभे राहिले असून गाव हिरवेगार होण्यास मोठी मदत झाली आहे हा एक आदर्श पॅटर्न असल्याचे रामहारी कातोरे यांनी सांगितले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!