मणिपूर घटनेचा संगमनेरात निषेध !
प्रतिनिधी —
मणिपूर येथील हिंसक घटनेचा संगमनेर मध्ये निषेध करण्यात आला.

छात्रभारती, राष्ट्र सेवादल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड यांच्या सयूंक्त विद्यमाने संगमनेर बस स्थानक या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले.

गेल्या अडीच महिन्यापासून मणिपूर राज्य जळत आहे. इथल्या महिलांची नग्न करून धिंड काढली जात आहे. तरीही केंद्र सरकार व मणिपूर सरकार भूमिका घेत नाही. बेटी बचाव बेटी पढाव चा नारा देणाऱ्या भाजपा सरकार पासूनच बेटी वाचवायची वेळ आली आहे. ज्या देशात महिलांना देवी म्हणायची प्रथा आहे त्या देशात महिलांची इज्जत अश्या पद्धतीने धिंड काढली जात आहे ही लाज वाटण्यासारखी बाब आहे. अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.

सरकार अजूनही मणिपूर येथील दंगल थांबवायला तयार नाही. अश्या घटना सातत्याने होत असताना सरकारच ह्या घटना घडवून आणत आहे असे आम्हला वाटत आहे. सरकारने हा गोंधळ थांबवावा असे निवेदन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना पाठवण्यात आले. या वेळी अनिकेत घुले, राम अरगडे, ॲड. रंजना गवांदे, सुरेखा बेनके, राहुल जऱ्हाड, कावेरी आहेर, गणेश जोंधळे, मानसी मांजबापू गुंजाळ, डॉ. दीपाली पानसरे, विकी माघाडे, कार्तिक घुले, अभिषेक वैराळ, डॉ. श्रद्धा वाणी, माधुरी शेवाळे, नम्रता दिघे, राजश्री दिघे आदी उपस्थित होते. प्रांत अधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

