आश्वी खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानाची तहसीलदारांकडे तक्रार !
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द स्वस्त धान्य दुकानात वारंवार अनियमता होत असल्याने स्थानिक लाभार्थ्यानची झोळी रिकामी राहत असल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड यानी नुकतीचं संगमनेरचे तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.

आश्वी खुर्द येथिल सामाजिक कार्यकर्ते किरण उत्तम गायकवाड यानी संगमनेरचे तहसीलदार यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रांरीत म्हटले आहे की, आश्वी खुर्द गावामध्ये शासकीय स्वस्त धान्य वाटप दुकान आहे. मात्र महिन्याच्या महिन्याला येणारे धान्य वेळेत वाटप केले जात नाही. गावची लोकसंख्या मोठी असतानाही अवघ्या चार ते पाच दिवसात धान्य वाटप करण्याची घाई करत धान्य संपवले जाते व लाभार्थ्याना धान्य संपल्याची बतावणी केली जाते. त्यामुळे तहसीलदार साहेब तुम्ही स्वत: येऊन खात्री करा अशी विनंती किरण गायकवाड यानी केली आहे. तर गावातील प्रतिष्ठित नागरीक याबाबत कोणतीही भुमिका घेत नसल्याबाबत खंत व्यक्त केली आहे.

यावेळी गायकवाड यानी सांगितले की, आश्वी खुर्द स्वस्त धान्य दुकानात मोठ्या प्रमाणात अनियमता असून मागील एक वर्षापासून नियमप्रमाणे धान्य वाटप केले जात नाही. धान्य वेळेत येऊनही ते लाभार्थ्याना वेळेत मिळत नाही. अरेरावी व दमदाटीची भाषा करून लाभार्थ्याना त्रास दिला जातो. याठिकाणी शासनाचा कुठलाही नियम फलक नाही व साधी तक्रार नोद वही सुद्धा नाही.

