संगमनेर शहर पोलिसांनी ७०० किलो गोवंश मांस पकडले !

रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी तरी अवैध कत्तलखाने बंद राहतील का ? 

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने चालवणाऱ्या तस्करांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत बेकायदेशीर रित्या गोवंश हत्या सुरूच ठेवल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे ७०० किलो गोवंश मांस आढळून आले आहे.

गोवंश हत्या बंदी असताना देखील संगमनेर मध्ये कत्तलखाने सुरूच असल्याचे नेहमीच उघड झाले आहे. आता त्यातही सणासुदीला देखील गोवंश हत्या करण्याचा पवित्रा या तस्करांनी घेतल्याचे दिसून येत आहे.

येत्या काही दिवसांत रामनवमी आणि हनुमान जयंती सारखे सण आहेत. या सांस्कृतिक उत्सवांच्या दिवशी तरी गोवंश हत्या थांबतील की नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

बुधवारी मध्यरात्री संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गुप्त खबऱ्यामार्फत गोवंश हत्या चालू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस पथकाला सावध करून संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले असता ७०० किलो गोवंश आढळून आले आहे.

शहरातील मदिना नगर येथे शाळेच्या पाठीमागे असलेल्या वाड्यात फरीद जावेद कुरेशी हा गोवंश जनावरांची कत्तल करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस पथक यांनी छापा घातला असता पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी पळून गेला. (राहणार जमजम कॉलनी संगमनेर)

सदर ठिकाणी वाड्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल केलेले मांस दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी संगमनेर यांना बोलवून घेतले आणि सदर मांसाची तपासणी केली असता सुमारे ७०० किलो वजनाचे १ लाख ७५ हजार रुपयांचे गोवंश मांस असल्याचे आढळून आले.

पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव तसेच पोलीस कॉन्स्टेबल दाभाडे, गवळी, उगले यांच्या पथकाने हा छापा टाकला आहे. पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव यांनी यासंदर्भात दिली असून पोलिसांनी फरिद जावेद कुरेशी (राहणार जमजम कॉलनी, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!