आश्वीत घरफोडी ; दोन लाखाची रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने लंपास !

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा घरफोडी झाली असून चोरट्यांनी तब्बल २ लाख ३ हजार ५०० रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली आहे.

आश्वी येथे गुरुवारी पहाटे ही घटना घडली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या वेळी फिर्यादीच्या घरातील किचनच्या खिडकीची जाळी उचकटून किचनच्या घराच्या दरवाजाची आतील कडी उघडून घरात प्रवेश करून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिन चोरून नेले.

दत्तात्रय निवृत्ती सातपुते (रा. उंबरी बाळापूर, ता. संगमनेर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!