संगमनेर शहरात घरफोडी ; सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

प्रतिनिधी —

संगमनेर शहर आणि तालुक्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनगरात घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.

शहरातील केशवनगर, राहणे मळा, गुंजाळवाडी शिवार या ठिकाणी ही घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे दरम्यान येथील भिंतीवरून चढून दरवाजा उघडून घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेले आहेत. या चोरीमध्ये एकूण ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

बन्याबापू सूर्याभान सहाणे (रा. केशवनगर, राहणे मळा, गुंजाळवाडी शिवार, संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक महाले पुढील तपास करत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!