तळेगाव दिघे येथे दुकान फोडले ; १७ इलेक्ट्रिक मोटर चोरल्या

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक मोटार रिवाइंडिंग चे दुकान फोडून दुकानातून १७ इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्याची घटना घडली आहे.

तळेगाव दिघे गावातील कळसेश्वर मशिनरी नावाचे मोटार रिवायडींग च्या दुकानात शुक्रवारी पहाटे ही चोरी झाली असून अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटर चे कुलूप तोडून आज प्रवेश केला. आणि दुरुस्तीसाठी आलेल्या १७ इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्या आहेत. या मुद्देमालाची रक्कम ३४ हजार रुपये आहे.

यामध्ये ७ इलेक्ट्रिक पाणबुडी मोटर, ७ बोअरवेलच्या मोटार आणि कडबा कुट्टी च्या ३ मोटार अशा एकूण १७ इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्या आहेत. संगमनेर तालुका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक पालवे हे करत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!