चार गावठी पिस्तुलांसह दोघेजण जेरबंद !

प्रतिनिधी —

गावठी कट्टे (देशी बनावटीचे पिस्तूल) विक्री करण्यासाठी येणाऱ्या दोघांना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

दत्तात्रय सुरेश डहाळे (वय ३४ रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता), सुलतान फत्तेमोहमद शेख (वय २९ रा. महलगल्ली, बेलापुर बु. ता. श्रीरामपुर) अशी आरोपींची नावे आहेत.

वरील दोन्ही आरोपी हे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या ठिकाणी चार गावठी कट्टे आणि जिवंत काढत असे विकण्यासाठी येत असल्याची माहिती नगरस्थाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमी मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. दोन्ही आरोपी बेलापूर बुद्रुक येथील वेशीतून बाजार तळाकडे येत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात पकडले व त्यांच्याकडून चार गावठी कट्टे आणि आठ जिवंत काडतुसे ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार मनोहर सिताराम गोसावी, दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे, सुरेश माळी, संदिप घोडके, पोलीस नाईक विशाल दळवी, शंकर चौधरी, दिलीप शिंदे, संदिप चव्हाण, पोलीस शिपाई सागर ससाणे, रोहित येमुल, रणजित, जाधव व उमांकात गावडे, अर्जुन बडे यांनी वेशांतर करुन हे कारवाई यशस्वी केली.

आरोपींकडून १ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मनोहर सिताराम गोसावी यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म ॲक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कायदेशिर कार्यवाही श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!