ख्रिस्त जयंती सर्व मानव जातीच्या जीवनात आनंद देणार सण – फा.सायमन शिनगारे.
प्रतिनिधी —
ख्रिस्त जयंतीनिमित्त घरावरील लखलखणारा तारा, ख्रिसमस ट्री, चर्चमधील येशू जन्माचा देखावा, कॅरल सिंगिंग, केक व चॉकलेट खाऊ वाटणारा सांताक्लॉज असे सुंदर दृश्य सर्वच चर्चेस मध्ये पहावयास मिळाले ख्रिस्त जन्माच्या गीताद्वारे समाजात प्रेम, दया, शांतीचा संदेश देण्याबरोबरच मनुष्याच्या जीवनातील अंधकार नष्ट करून पृथ्वीवरील सर्व मानवी जातीच्या जीवनात प्रकाशाचा अनोखा आनंद देणारा असा हा सण असल्याचा संदेश सेंट मेरी धर्मग्राम प्रमुख फादर सायमन शिनगारे यांनी दिला.

सेंट मेरी धर्मग्राम प्रमुख फा.सायमन शिनगारे, ज्ञानमाता विद्यालयाचे प्राचार्य फा. जेम्स थोरात, फा.अबा वाघमारे, संत इग्नाथी चर्चचे प्रमुख फा. नेल्सन परेरा, फा.प्रकाश शहाराव, मेथॉडिस्ट चर्चचे रेव्ह.जॉर्ज चोपडे, बिलिव्हर्स चर्चचे पा.ग्रेगरी केदारी, बेथेल वर्शीप सेंटरचे पा. शिवाजी लांडगे, बापू शेळके, दीपक शेळके, अमोल साळवे, विजय दारोळे आदींच्या चर्चेस मधून धार्मिक एकोपा, महामारी दूर व्हावी, राजकीय परिस्थितीमध्ये स्थिरता यावी म्हणून ख्रिस्त जयंती निमित्ताने आपल्या माणुसकीचा वर्षाव सत्कृत्याद्वारे दिन दुबळे व गरजवंतांसाठी व्हावा हा महत्त्वाचा संदेश सर्वत्र देण्यात आला.

तर सर्व पंथीय चर्चेसमध्ये धार्मिक विधी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येऊन ख्रिस्ती बांधवांबरोबरच आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे आदींनी समस्त ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी सि.आशा ओहोळ, सुखदेव शेळके, कैलास भोसले, लाजारस केदारी, प्रा.बाबा खरात, ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, प्रभाकर दुशिंग, अँड.विजयानंद पगारे, संगीता बारसे, तेरेसा सोनवणे, सुनंदा गायकवाड, सुहास गायकवाड, सुनील खरात, संध्या शेळके, संजय कदम, सचिन मुन्तोंडे, अनुप कदम, सत्यानंद कसाब, प्रवीण रोहम, अंन्तुन घोडके, रत्नाकर पगारे, विनोद गायकवाड, प्रकाश भोसले आदींसह मोठ्या संख्येने तालुक्यात ख्रिस्ती बांधवांनी नाताळ उत्साहात साजरा केला.

