चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आनंद मेळावा संपन्न !
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये आनंद मेळावानमोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. आनंद मेळाव्याचे उद्घाटन नायब तहसीलदार रमाकांत कडनोर यांच्या हस्ते करण्यात आले.

व्यासपीठावर राजहंस दूध संघाचे माजी चेअरमन आर.बी. राहणे, संस्थेचे खजिनदार विठ्ठल कढणे, संस्थेचे सेक्रेटरी अनिल कढणे, संचालक रामदास राहणे, संचालक अशोक राहणे, उपसरपंच भाऊराव राहणे, पंढरीनाथ राहणे, मुळगंगा पतसंस्थेचे चेअरमन एल.आर. राहणे तसेच गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य अशोक खेमनर यांनी प्रास्ताविक केले व आनंद मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. नायब तहसीलदार कडनोर म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना वाव देणारी ही एक सुवर्णसंधी आहे. विद्यार्थ्यांमधील व्यवहार ज्ञानाची जोड शाळेने विद्यार्थ्यांमध्ये जोपासली आहे. शाळेतील वेगवेगळे उपक्रम निश्चितच मुलांमध्ये कलागुणांना वाव देतात. मागील आठवड्यातील शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन, क्रीडा महोत्सव व आजचा आनंद मेळावा हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या विद्यालयांमध्ये मुलांच्या कलागुणांना खरी चालना मिळते.

आनंद मेळाव्यामध्ये विविध गुणदर्शन, वासुदेव, मरिआईचे फॅन्सी ड्रेस, विद्यार्थ्यांनी आणलेले वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, भाजीपाला, बैल जोडी, शेळ्या मेंढ्यांची विक्री, ससे, गावठी अंडे, चहाचे स्टॉल, हस्तकला या सर्व गोष्टींचा आस्वाद गावकरी व विद्यार्थ्यांनी घेतला.

आभार प्रदर्शन उपप्राचार्य राहणे कैलास, सूत्रसंचालन राजेंद्र डूबे, सुरेश राहणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे उप-मुख्याध्यापक सुनील कढणे, पर्यवेक्षिका सुनंदा उगले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले.

