संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर माजी महसूल मंत्री आमदार थोरात यांचे वर्चस्व !

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील निवडणूक झालेल्या सर्व ग्रामपंचायतमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व प्राप्त केले असून अनेक ग्रामपंचायत मध्ये थोरात समर्थकांच्या दोन गटांमध्येच निवडणुका झाल्या आहेत. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींवर आमदार बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले असून विखेंच्या कार्यक्षेत्रातही आमदार थोरात गटाने जोरदार बाजी मारत विखे गटाला धक्का दिला आहे. अशी माहिती थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींची मतमोजणी शांततेमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात संपन्न झाली. यामध्ये निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचा यशोधन जनसंपर्क कार्यालयात इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, कारखान्याचे अध्यक्ष  बाबा ओहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, उपसभापती नवनाथ आरगडे,संतोष हासे यांचे सह  तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी वाघापूर, खराडी, चिंचोली गुरव, जांभूळवाडी, रणखांबवाडी, दरेवाडी, सायखिंडी, जांबुत बुद्रुक, कर्जुले पठार, डोळासने, पिंपरणे, अंभोरे, कोळवाडे, जोर्वे, वरझडी बुद्रुक, वरझडी खुर्द, करुले, निळवंडे, हंगेवाडी, ओझर खुर्द, उंबरी बाळापुर, निमगाव जाळी, चिकणी, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक,  साकुर, निमगाव भोजापूर, पोखरी हवेली, या गावांमध्ये आमदार बाळासाहेब थोरात समर्थकांनी सरपंच पदासह सर्व सदस्य पदावर विजय मिळवला आहे. तर इतर ग्रामपंचायतींमध्येही आमदार थोरात गटाने बहुमत मिळवले आहे. विखेंच्या कार्यक्षेत्रात असलेल्या उंबरी बाळापूर, निमगाव  जाळी, ओझर खुर्द, हंगेवाडी या ग्रामपंचायती आमदार थोरात गटाने ताब्यात घेतल्या आहेत.

यावेळी इंद्रजित थोरात म्हणाले कि, निवडणूका या लोकशाही प्रणालीच्या अनिवार्य भाग आहे. निवडणुकी नंतर मात्र कोणतेही मतभेद न ठेवता गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. आमदार बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वाखाली संगमनेर  तालुक्यात कायम शांततेचे वातावरण असून विकास कामांमध्ये सर्वांना बरोबर घेवून काम सुरु आहे.प्रत्येक निवडणूकीच्या निकालानंतर लगेच कामास सुरुवात होत असल्याने निवडणूकांमध्ये सातत्याने यश मिळत आहे.संगमनेर तालुक्यातील सर्व जनतेचा विश्‍वास कायम पाठिशी असून सुसंस्कृत राजकारणाची परंपरा व विकास काम यामुळे संगमनेर तालुका रायात अग्रगण्य ठरला आहे .

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या कि, आ.थोरात यांचे नेतृत्वाखाली नेहमी सर्व समाजातील जनतेला संधी दिली जात आहे.तालुक्यातील मतदार हे कायम काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत.नविन पदाधिकार्‍यांनी आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडतांना जनतेच्या सर्वांगिण विकासात योगदान देणे महत्वाचे आहे.ग्रामपंचायत निवडणूकीत आपल्याच कार्यकर्त्यांचे दोन्ही पॅनल एकमेकांसमोर उभे होते. निवडणूकी नंतर सर्वांनी पुन्हा एकत्र आले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार बाळासाहेब थोरात , आमदार डॉ.सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गा तांबे, सत्यजीत तांबे, रणजितसिंह देशमुख, अ‍ॅड.माधवराव कानवडे, मिलींद कानवडे, बाबा ओहोळ, नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, संपत डोंगरे, लक्ष्मणराव कुटे, शंकरराव खेमनर, महेंद्र गाडगे, सुनंदाताई जोर्वेकर, सुधाकर जोशी यांचेसह विविध पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!